RCB Vs KKR, IPL 2022: मुंबईच्या स्टेडियममध्ये खेळण्यात येणाऱ्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सहाव्या सामन्यात बंगळुरूच्या संघानं (Royal challengers Bangalore) नाणेफेकू जिंकून कोलकाताच्या संघाला (Kolkata Knights Riders) प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. पहिला सामना गमावल्यानंतर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली बंगळुरू संघ कोलकाताविरुद्ध विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. तर, कोलकाताचा कर्णधार श्रेयस ब्रिगेडची नजर विजयाची घोडदौड कायम राखण्यासाठी असेल. आजच्या सामन्यात दोन्ही संघ कशी कामगिरी करतात? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


पंजाब किंग्जविरुद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात आरसीबीचा पराभव झाला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत आरसीबीनं पंजाबसमोर 206 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं होतं. मात्र, पंजाबनं 206 धावांचं आव्हान एक षटक राखून पूर्ण केलं. दुसरीकडं श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरनं पहिल्या सामन्यात गतविजेत्या चेन्नईचा पराभव करून विजयी सुरुवात केली. या सामन्यात कोलकातानं 6 विकेट्स राखून सहज विजय मिळवला. आता श्रेयस ब्रिगेड आता विजयाची घोडदौड कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे.


कोलकात्याचा संघ:


अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, नितिश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्ज, शेल्डन जॅक्सन (विकेटकिपर), आंद्रे रसेल, सुनील नरेन, टीम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.


बंगळुरूचा संघ:
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक (विकेट किपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, डेव्हिड विली, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज.



हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha