IPL, RCB vs KKR : इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज रॉयल चँलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या दोन्ही संघामध्ये 'काटेंकी टक्कर' पाहायला मिळणार आहे. सायंकाळी 7:30 वाजता नवी मुंबईच्या डीवाय पाटील मैदानात खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघाकडून दमदार खेळाची अपेक्षा आहे. केकेआरने यंदाच्या हंगामात एक सामना जिंकला असून आरसीबी एका सामन्यात पराभूत झाली आहे. दरम्यान आजच्या सामन्यात खालील पाच खेळाडू दमदार प्रदर्शन करण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.


1. सर्वात आधी म्हणजे आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याच्याकडून सर्वांना अपेक्षा आहेत. कारण हंगामाच्या पहिल्याच सामन्यात त्याने 88 धावांची शानदार खेळी केली होती. यात 7 षटकार आणि 3 चौकार त्याने लगावल्याने आजही त्याच्याकडून अशाच खेळाची अपेक्षा आहे.


2. दिग्गज खेळाडू विराट कोहलीने आरसीबीकडून पहिल्याच सामन्यात नाबाद 41 धावा केल्या होत्या. त्यामुळे आजही तो दमदार प्रदर्शन करेल अशी अपेक्षा असून त्याच्याकडे अनेकांच्या नजरा असतील.


3. कोलकात्याचा सीनियर खेळाडू अंजिक्य रहाणेने देखील पहिल्या सामन्यात 44 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे तो पुन्हा फॉर्ममध्ये आल्याची चर्चा होत असून दुसऱ्या सामन्यातही त्याच्याकडून दमदार खेळीची अपेक्षा आहे.


4. केकेआरचा युवा खेळाडू वेंकटेश अय्यर पहिल्या सामन्यात 16 च रन करु शकला असला तरी मागील आयपीएलमध्ये (IPL 2021) त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामुळे यंदाही त्याच्याकडून अनेकांना चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. 


5. विस्फोटक ऑलराउंडर आंद्रे रसेल याने आजवर अनेक सामन्यात तुफान खेळी केली आहे. पहिल्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण आज संधी मिळाल्यास तो नक्कीच तुफान खेळी करेल अशी इच्छा केकेआर चाहते व्यक्त करत आहेत.


हे देखील वाचा-