Mitchell Marsh Ruled out: पाकिस्तान दौऱ्यावर गेलेला ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मिशेल मार्श एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडलाय. दुखापतीमुळं त्याला संघातून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. रविवारी क्षेत्ररक्षणादरम्यान त्याला दुखापत झाली होती. परिणामी, मंगळवारी लाहोरमध्ये खेळण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही तो खेळू शकला नाही. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं 88 धावांनी जिंकला. आयपीएलच्या मेगा ऑक्शमध्ये दिल्लीच्या संघानं त्याला 6.50 कोटीत विकत घेतलं होतं. 


क्रिकेट ऑस्ट्रेलियानं बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे की, "मार्श दिल्ली कॅपिटल्स संघात सामील होण्यासाठी भारतात रवाना होणार आहे. जिथे तो ऑस्ट्रेलियाचे माजी आणि सध्याचे न्यू साउथ वेल्सचे फिजिओ पॅट फरवार्ट यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेईल. "पाकिस्तान मालिकेत न खेळल्याने निराश झालो आहे. पण पुढील दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन संघाशी पुन्हा संपर्क साधण्यास उत्सुक आहे" , अशी प्रतिक्रिया मिशेल मार्शनं पाकिस्तान एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडल्यानंतर दिली आहे.


दरम्यान, एकदिवसीय मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानला कसोटी मालिकेत धुळ चाखली होती. सध्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात एकमेव टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाला अनेक दुखापतींच्या समस्यांचा सामना करावा लागला असून टीम फिजिओ ब्रेंडन विल्सन यांची कोविड-19 सकारात्मक चाचणीचा देखील संघाला फटका बसलाय. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha