Virat Kohli in Naya Sher Aya Song : आयपीएलचा 16वा हंगाम अर्थात आयपीएल 2023 (IPL 2023) यंदा आयोजित केली जाणार आहे. जगातील ही सर्वात मोठी क्रिकेट लीग सुरू होण्यास अजून काही महिने बाकी आहेत. त्यापूर्वीच स्पर्धेची धामधूम सुरु झाली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव झाला असून आता लिलावानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने अर्थात आरसीबीने (RCB) 'नया शेर आया' हे नवीन टीमचं एक धांसू गाणं लॉन्च केलं आहे. या गाण्यात भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीची (Virat Kohli) एका खास अंदाजात दिसत असून तो डान्सही करत आहे. प्रसिद्ध रॅपर डिवाईन (Divine) या गाण्याचा सिंगर आहे. आरसीबीचे हे गाणे सोशल मीडियावरही वेगाने व्हायरल होत आहे.


विराटचा धांसू अंदाज


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या या नया शेर आया या गाण्यात विराट कोहली स्पर्धेआधीच आयपीएलमधील प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देताना दिसत आहे. त्याचबरोबर या गाण्यात विराट डान्सही करताना दिसत आहे. विराटची ही वेगळी आणि खास स्टाईल चाहत्यांना खूप आवडल्यातं दिसून येत आहे. या गाण्यात विराटसह काही इतरही खेळांतील आणि क्षेत्रातील व्यक्तींचा स्ट्रगल थोडक्यात मांडण्यात आल्याचं दिसून येत आहे.


डिवाईनसह जोनिता गांधीही गाण्यात


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (Royal Challengers Banglore) हे नवीन गाणं नया शेर आया रॅपर डिवाईन (Rapper Divine) आणि गायिका जोनिता गांधी (Jonita Gandhi) यांनी गायले आहे. आरसीबीनं हे गाणं त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर अपलोड केलं आहे. हे गाणं अपलोड करताना आरसीबीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आता तुमचा मार्ग निवडण्याची, स्वत:चा खेळ खेळण्याची आणि काही जादू दाखवण्याची वेळ आली आहे.' या गाण्यात आरसीबीचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली डिवाईन आणि जोनितासोबत धमाल करताना दिसत आहे. सध्या विराट कोहली सध्या श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेत (India vs Sri Lanka T20 Series) टीम इंडियासोबत (Team India) नाही. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत (IND vs SL ODI) तो भारतीय संघात पुनरागमन करेल, अशी आशा आहे.


पाहा संपूर्ण गाणं-



हे देखील वाचा-