Most Sixes IPL 2022 : आयपीएलचा 15 वा हंगामा उत्तरार्धाकडे झुकला आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात आतापर्यंत गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळालाय. गोलंदाज वरचढ चढत असले तरीही काही फलंदाजांनी पॉवरहिटिंग करत लक्ष वेघलेय. काही फलंदाजांनी चौकार आणि षटकारांनी धावांचा पाऊस पाडलाय. यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या पहिल्या पाच फलंदाजामध्ये राजस्थान रॉयल्सच्या तीन फलंदाजांचा समावेश आहे. पाहूयात यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजाबाबत...


जोस बटलर 
यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये जोस द बॉसचं नाव आघाडीवर आहे. राजस्थान रॉयल्सचा सलामी फलंदाज जोस बटलर यंदा तुफानी फॉर्ममध्ये आहे. बटलरने 11 सामन्यात 618 धावांचा पाऊस पाडलाय. बटलरने तीन शतकेही झळकावली आहेत. यादरम्यान बटलरने तब्बल 37 षटकार मारले आहेत.  


आंद्रे रसेल  -
यंदाच्या हंगामात आंद्रे रसेल याला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. त्याच्या प्रदर्शनात चढउतार पाहायला मिळाला. पण असे असतानाही रसेलने षटकारांची बरसात केली आहे. यंदाच्या हंगामात रसेलने आतापर्यंत 28 षटकार लगावले आहेत. रसेलच्या नावावर 281 धावा आहेत.  


लियाम लिव्हिंगस्टोन
पंजाबचा विस्फोटक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन यंदाच्या हंगामात सर्वात दूर षटकार मारणारा खेळाडू आहे. लियामने वादळी खेळी करत संघाचा डाव अनेकदा सावरलाय. लियामने यंदाच्या हंगामात आतापर्यंत 25 षटकार लगावलेत.  


शिमरोन हेटमायर  -
राजस्थान संघासोबत खेळताना हेटमायरने फिनिशरची भूमिका चोख बजावली आहे. 11 सामन्यात त्याने 291 धावा चोपल्या आहेत. यादरम्यान त्याने 21 षटकारही लगावलेत.  


संजू सॅमसन  -
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनच्या नावावर सध्या 21 षटकारांची नोंद आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या पहिल्या पाच खेळाडूमध्ये संजू सॅमसन एकमेव भारतीय खेळाडू आहे. संजू सॅमसनच्या नावावर 11 सामन्यात 321 धावा आहेत.  


हे देखील वाचा-