LSG Vs GT: आयपीएल सर्वात मजबूत संघ लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स (Lucknow Super Giants vs Gujarat Titans) यांच्यात आज सामना रंगणार आहे. पुण्यातील (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium) हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात जिंकून प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदा हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्या एकमेकांच्या समोर येणार आहेत. या सामन्यापूर्वी हार्दिकचा मुलगा अगस्त्य काका क्रुणाल पांड्याच्या संघाला चीअर करताना दिसला आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. 


क्रुणाल पांड्यासाठी अगस्त्या लकी चार्म
गुजरातविरुद्ध सामन्यापूर्वी क्रुणाल पांड्यानं इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये हार्दिकचा मुलगा अगस्त्यानं लखनौची जर्सी घातली आहे.  गुजरातविरुद्ध सामन्यासाठी मला लकी चार्म मिळाला, असं क्रुणाल पांड्यानं या फोटोला कॅप्शन दिलं आहे.


मेगा ऑक्शनमध्ये लखनौनं क्रुणालला 8.25 कोटीत विकत घेतलं.
आयपीएलच्या पंधरावा हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबईच्या संघानं क्रुणाल पांड्याला रिलीज केलं होतं. त्यानंतर मेगा ऑक्शनमध्ये लखनौच्या संघानं त्याला 8 कोटी 25 लाखात विकत घेतलं. क्रुणाल पांड्याची मूळ किंमत 2 कोटी होती. तर, हार्दिक पांड्याला गुजरातच्या संघानं मेगा ऑक्शनपूर्वी 15 कोटीत ड्राफ्ट केलं होतं. हार्दिक पांड्या गुजरातच्या संघाचं नेतृत्व करत आहे. तर, राशीदला उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. 



दोन्ही संघाची आयपीएल 2022 मधील कामगिरी
आयपीएलच्या गुणतालिकेत लखनौचा संघ अव्वल स्थानी आहे. यंदाच्या हंगामात लखनौच्या संघानं 11 सामन्यांपैकी 8 विजय मिळवले आहेत. तर, गुजरातनं 11 सामन्यापैकी तीन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. तर, आठ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघाची कामगिरी एकसारखीच आहे. परंतु, लखनौचा रनरेट चांगला असल्यानं संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचला आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघ एकमेकांच्या समोर येणार आहेत. तसेच आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


हे देखील वाचा-