IPL 2022: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आक्रमक गोलंदाज जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah)  काल कोलकात्याविरुद्ध सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली. आयपीएल 2022 च्या 56 व्या सामन्यात जसप्रीत बुमराहनं भेदक गोलंदाजी करत कोलकात्याच्या फलंदाजांचं कंबरडं मोडलं. या सामन्यात त्यानं चार षटक टाकून 10 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. आयपीएलच्या इतिहासातील हे जसप्रीत बुमराहचं आतापर्यंतचं सर्वात चांगलं प्रदर्शन आहे. जसप्रीत बुमराहचं प्रदर्शन पाहून अनेक दिग्गज क्रिकेटपटू त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

बुमराहनं याआधी 2020 मध्ये त्याच्या आयपीएल कारकिर्दीतलं उत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं. त्यावेळी दिल्ली कॅपिटल्सविरुद्द त्यानं 14 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या होत्या आणि राजस्थानविरुद्ध 20 धावा देत चार विकेट्स मिळवल्या. पंरतु, यंदाच्या हंगामात त्यानं कोलकात्याविरुद्ध 10 धावा देऊन पाच विकेट्स घेतल्या आहेत. या सामन्यात त्यानं चार षटक टाकले. त्यातील तिसरे षटक निर्धाव टाकलं. तर, अखेरच्या षटकात एकच धाव दिली. 

कोलकात्याविरुद्ध बुमराहचा संपूर्ण स्पेल-

पहिली ओव्हर-  4, 0, 1, 0, 0, 0
दुसरी ओव्हर-   0, W, 2 ,1, W, 1
तिसरी ओव्हर-  W, 0, W, W, 0, 0
चौथी ओव्हर-    0, 0, 0, 0, 0, 1

आयपीएलमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांची यादी-

खेळाडू ओव्हर बॉलिंग फिगर्स मेडन इकोनॉमी विरोधी संघ वर्ष
अल्झारी जोसेफ 3.4 6/12 1 3.27 सनरायजर्स हैदराबाद 2019
सोहेल तन्वीर 4 6/14 0 3.50 चेन्नई सुपर किंग्ज 2008
अॅडम झंपा 4 6/19 0 4.75 सनरायजर्स हैदराबाद 2016
अनिल कुंबळे 3.1 5/5 1 1.57 राजस्थान रॉयल्स 2009
जसप्रीत बुमराह 4 5/10 1  2.5 कोलकाता नाईट रायडर्स 2022

 

आयपीएलमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत बुमराहचा समावेश समावेश
जसप्रीत बुमराह आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या टॉप 5 गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. या यादीत अल्झारी जोसेफ (6/12), सोहेल तन्वीर (6/14), अॅडम झम्पा (6/19) आणि अनिल कुंबळे (5/5) यांचा समावेश आहे. या यादीत जसप्रीत बुमराह पाचव्या स्थानावर आहे. त्यानं 10 धावांत 5 बळी घेतले आहेत. त्याने आणखी एक विकेट घेतली असती तर तो आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी करणारा गोलंदाज ठरला असता.

हे देखील वाचा-