IPL 2022: आयपीएलमध्ये राजस्थानच्या संघाकडून (Rajasthan Royals) खेळणारा तडाखेबाज फलंदाज शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) पहिल्यांदाच बाबा बनला आहे. पत्नीच्या प्रसूतीची तारीख जवळ आल्यानं तो बायो बबल सोडून आपल्या मायदेशी परतला होता. हेटमायरनं त्याच्या नवजात बाळासोबत खेळतानाचा गोंडस व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हेटमायरची ही पोस्ट काही क्षणातच व्हायरल झाली असून अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 


शिमरॉन हेटमायरनं शेअर केलेल्या व्हिडिओत तो त्याच्या मुलाला हातात घेतल्याचं दिसत आहे. यासोबतच त्यानं आपल्या मुलाचे या जगात स्वागत केले आहे आणि पत्नीसाठी लिहिले आहे की, त्याचे तिच्यावर खूप प्रेम आहे. दरम्यान, आयपीएलचे प्लेऑफचे सामने सुरू होण्याआधी भारतात परतणार आहे. 


आयपीएल 2022 मध्ये शिमरॉन हेटमायरची दमदार कामगिरी
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात शिमरॉन हेटमायरनं दमदार कामगिरी करून दाखवली आहे. त्यानं स्वत:च्या जीवावर राजस्थानच्या संघाला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. राजस्थानच्या संघासाठी तो मध्यक्रमावर फलंदाजी करण्यासाठी येतो. तसेच सामना फिनिश करण्यासाठी आक्रमक फलंदाजी करतो. यंदाच्या हंगामात त्यानं 11 सामने खेळले आहेत. ज्यात 72.75 सरासरीनं 291 धावा केल्या आहेत. यात 18 चौकार आणि 21 षटकार आहेत. 


राजस्थान रॉयल्सच्या संघाचं ट्वीट
राजस्थान संघासाठी मॅच विनिंग खेळी खेळणारा हेटमायर दोन दिवसांपूर्वीच वेस्ट इंडीजला परतला होता. राजस्थान संघानं ट्वीटरवर व्हिडिओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली होती. हेटमायर त्याच्या बाळाच्या जन्मानंतर मुंबईला परतणार आहे आणि आयपीएलमधील उर्वरित सामन्यांसाठी उपलब्ध राहणार आहे, अशीही माहिती देण्यात आली होती. 



हे देखील वाचा-