Punjab Kings Vs Gujarat Titans Marathi News: आयपीएल 2024 च्या 17 व्या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सचा 3 गडी राखून पराभव केला. पंजाबसाठी हा विजय खूप खास होता, कारण एकप्रकारे गमावलेल्या सामन्यात पंजाबने विजय मिळवला. 


पंजाबने 70 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या, मात्र येथून शशांक सिंगने जबाबदारी स्वीकारली. आशुतोषच्या 31 धावांच्या झंझावाती खेळीमुळे हा सामना बहुतांशी पंजाबच्या बाजूने गेला. मात्र शेवटच्या षटकांत त्याची विकेट पडल्याने सामन्यात पुन्हा एकदा उत्साह वाढला. चौथ्या चेंडूवर शशांकच्या बॅटमधून चौकार आला आणि पंजाबने गुजरातच्या तोंडून विजय हिसकावून घेतला.


शेवटच्या 5 षटकांत 62 धावा हव्या होत्या-


15 व्या षटकानंतर पंजाब किंग्जची धावसंख्या 5 विकेटवर 138 धावा होती. राशिद खानने टाकलेल्या 16व्या षटकात 15 धावा आल्या असल्या तरी त्याने जितेशलाही बाद केले. मोहित शर्माने पुढच्या षटकात फक्त 6 धावा दिल्या, शेवटच्या 3 षटकात 41 धावा आवश्यक होत्या. गुजरातच्या गोलंदाजांनी पुढच्या 2 षटकात 34 धावा दिल्या, त्यामुळे शेवटच्या षटकात पंजाबला फक्त 7 धावांची गरज होती. शेवटचे षटकही रोमांच भरले होते, पण एक चेंडू शिल्लक असताना पंजाबने हा सामना 3 विकेट्सने जिंकला.






शेवटच्या षटकांत काय घडले?


शेवटच्या षटकात पंजाबला विजयासाठी 7 धावांची गरज होती. गुजरातकडेही शेवटच्या षटकासाठी अनुभवी उमेश यादवचा पर्याय होता, मात्र कर्णधार शुभमन गिलने दर्शन नळकांडेवर विश्वास व्यक्त केला. अप्रतिम फलंदाजी करणाऱ्या आशुतोष शर्माला नळकांडेने पहिल्याच चेंडूवर बाद केले, तरी गिलचा निर्णय योग्य आहे, असे वाटले, पण तसे झाले नाही. पहिल्या चेंडूवर विकेट पडल्यानंतर हरप्रीत ब्रार फलंदाजीला आला.


त्यानंतर दर्शनाचा पुढचा चेंडू अंपायरने वाईड घोषित केला, त्यानंतर आता पाच चेंडूत विजयासाठी ६ धावांची गरज होती. पुढचा चेंडूही अंपायरने वाईड दिला, पण गुजरातचा यष्टिरक्षक रिद्दिमन साहाच्या विनंतीवरून कर्णधार गिलने रिव्ह्यू घेतला आणि तो त्याच्या बाजूने गेला. त्यानंतर ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर हरप्रीत ब्रारने 1 धाव घेतली आणि आता शशांक सिंग स्ट्राइकवर आला होता, जो वेगवान स्फोटक फलंदाजी करत होता. चौथ्या चेंडूवर शशांकने दमदार चौकार मारला. आता दोन चेंडूत 1 धावांची गरज होती आणि ही विजयी धाव बॅटने नाही तर लेग बायद्वारे काढली गेली आणि पंजाबने 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करून विजय मिळवला.


संबंधित बातम्या-


हार्दिक पांड्यावर चाहत्यांचा रोष का वाढला?; रवी शास्त्रींनी सांगितले यामगील एकमेव कारण!


'मयंक यादवला आंतरराष्ट्रीय क्रिकेट...', स्टुअर्ट ब्रॉडने केला मोठा दावा; नक्की काय म्हणाला, पाहा!