Mumbai Indians Hardik Pandya: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये  मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सलग तिसरा पराभव झाला. हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार बनवल्यानंतर मुंबई इंडियन्सला एकही सामना जिंकता आलेला नाही. 


हार्दिक पंड्याला कर्णधार करून मुंबई इंडियन्सने चाहत्यांचा रोष ओढवून घेतला आहे. कर्णधारपदाचा निर्णय घेण्यापूर्वी संघाने संवादात स्पष्टता राखली असती, तर हा वाद टाळता आला असता, असं भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितले.


हार्दिक पांड्याने हा वाद सुरु असताना शांत राहावे. दमदार कामगिरी दाखवून वादळाचा सामना करावा. हा भारतीय संघ नाही. यामध्ये संघ मालकाने खेळाडूंना सर्वाधिक पैसे दिले आहेत. त्यामुळे कर्णधार कोण असावा हा त्यांचा अधिकार आहे. पण त्यांनी संवादात स्पष्टता ठेवणे गरजेचे होते, असं स्पष्ट मत रवी शास्त्री यांनी मांडले.


...म्हणून चाहत्यांमध्ये विरोध वाढला


आम्हाला भविष्याचा विचार करायचा आहे. रोहितने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. पण, पुढचा विचार करताना आम्हाला नव्या कर्णधाराचा शोध घ्यायचा आहे त्याचाच हा एक भाग आहे, असे संघाला बोलता आले असते. हा संवाद संघाला साधता न आल्यामुळे चाहत्यांमधील विरोध वाढला, "असे मत शास्त्री यांनी मांडले. सलग तीन सामन्यात पराभव पत्करावे लागल्यामुळे चाहत्यांचा रोष वाढला आहे. मुंबा इंडियन्सने एकदा का विजय मिळविण्यास सुरुवात केली की वाद विसरला जाईल, असंही रवी शास्त्री यांनी सांगितले.


हार्दिक पांड्याला जोरदार हूटिंग


पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरणाऱ्या मुंबईची स्थिती सध्या ठीक नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईला लागोपाठ तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईच्या ताफ्यातील वातावरणही ठीक नसल्याचे दिसत आहे. हार्दिक पांड्या एकटा पडल्याचे अनेक प्रसंगावरुन दिसत आहे. चाहत्यांकडून त्याला हूटिंग केले जात आहे. हार्दिक पांड्याला जोरदार हूटिंग केलं जात आहे.


मुंबईचा संघ तळाशी - 


हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला आतापर्यंत एकही विजय नोंदवता आला नाही. तिन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. गुणतालिकेत मुंबईचा संघ दहाव्या क्रमांकावर पोहचला आहे. मुंबई हा एकमेव असा संघ आहे, ज्याला अद्याप एकही विजय नोंदवता आला नाही. 


संबंधित बातम्या:


18 वर्षांच्या अंगक्रिश रघुवंशीने दिल्लीला अस्मान दाखवलं; आई-वडिलांनी केलंय भारताचं प्रतिनिधित्व


DC vs KKR: दिल्लीच्या पंतने गोलंदाजाला धुतलं, केकेआरच्या मालकाने काय केलं?, शाहरुन खानचं होतंय कौतुक,Video


आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, Photos