एक्स्प्लोर

IPL: भारतानं पहलगामचा बदला घेतला, ऑपरेशन सिंदूरचा आयपीएलवर परिणाम होणार? केकेआर अन् चेन्नईची मॅच रद्द होणार का? बीसीसीआयकडून अपडेट

Operation Sindoor Airstrike On Pakistan: भारतीय सैन्य दलांकडून ऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. याशिवाय देशभरात विविध ठिकाणी मॉक ड्रील सुरु आहेत.  

CSK vs KKR Live Match Update नवी दिल्ली :  भारतीय सैन्य दलांकडून पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करुन पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यात आला आहे. इंडियन आर्मीच्या एक्स अकाऊंटवरुन जस्टीस इज सर्वड अशा प्रकारचं ट्विट करून ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. भारताकडून सतर्कता म्हणून देशभर मॉक ड्रील केलं जात आहे. या दरम्यान ऑपरेशन सिंदूरचा आयपीएलवर परिणाम होऊ शकतो अशा चर्चा सुरु आहेत. काही जणांनी आज होणारी चेन्नई विरुद्ध कोलकाता मॅच होणार की नाही याबाबत देखील चर्चा सुरु झाल्या होत्या. अखेर बीसीसीआयनं यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.

चेन्नई विरुद्ध कोलकाता मॅच खरंच रद्द होणार?

वृत्तसंस्था एएनआयच्या नुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या यंदाच्या हंगामावर कोणताही परिणाम होणार नाही. भारत पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाचा आयपीएलवर परिणाम होणार नाही. आयपीएल ज्या प्रकारे सुरु आहे त्यानुसार सुरु राहील. आज चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील मॅचवर देखील कोणताही परिणाम होणार नाही. चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्यातील मॅच सायंकाळी 7 .30 वाजता सुरु होईल.  

गुणतालिकेत दोन्ही संघांची स्थिती काय?

आयपीएल 2025 च्या प्लेऑफ मध्ये प्रवेश करणाऱ्या संघांची नावं येत्या काही दिवसात निश्चित होतील. चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पाडली आहे. कोलकाताना अजून देखील टॉप 4 मध्ये जाण्याची आशा आहे. चेन्नई विरुद्धच्या मॅचमध्ये अजिंक्य रहाणेच्या केकेआरला विजय मिळवावा लागेल. चेन्नई विरुद्ध जिंकल्यास केकेआरचं आव्हान कायम राहील. 

चेन्नई सुपर किंग्जनं आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना केवळ 2 मॅचमध्ये विजय मिळवता आला आहे. तर, 9 मॅचेसमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. केकेआरनं देखील आतापर्यंत 11 मॅच खेळल्या आहेत. त्यामध्ये  5 विजय आणि 5 पराभव झाला आहे. तर, एका सामन्याचा निकाल जाहीर झालेला नाही. केकेआरच्या नावावर सध्या 11 गुण असून ते सहाव्या स्थानावर आहेत. केकेआरला राहिलेल्या तीन मॅच जिंकणं आवश्यक आहे.  

दरम्यान, मुंबईला पराभूत करत गुजरात टायटन्सनं गुणतालिकेत पहिलं स्थान मिळवलं आहे. तर, दुसऱ्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आहे. तिसऱ्या स्थानावर पंजाब किंग्ज असून चौथ्या स्थानावर मुंबई इंडियन्स आहे. पाचव्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स आणि सहाव्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्स हा संघ आहे. तर, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबादचं आव्हान संपुष्टात आलं आहे. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget