CSK Post MS Dhoni Special Video : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने पुन्हा एकदा चषकावर नाव कोरले. चेन्नईच्या विजयानंतर चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.  गुजरातविरोधात अंतिम सामन्यात रोमांचक विजय मिळवले...रविंद्र जाडेजा याच्या जिगरबाज खेळीच्या बळावर चेन्नईने पाचव्यांदा चषकावर नाव कोरले. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने पाचव्यांदा चषक उंचावला. धोनी निवृत्त होणार का ? असा सवाल त्यानंतर प्रत्येकाच्या मनात येत होता. धोनीने त्यावर आपल्या स्टाईलने उत्तर देत या चर्चेला पूर्णविराम दिला. पण आता चेन्नईने आपल्या अधिकृत खात्यावर धोनीचा एक व्हिडीओ पोस्ट केलाय. 33 सेकंदाच्या या इमोशन व्हिडीओनंतर पुन्हा एकदा धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. 


13 जून 2023 रोजी सायंकाळी चेन्नई सुपर किंग्स संघाने ट्विटवर धोनीचा स्पेशल व्हिडीओ पोस्ट केला. 33 सेकंदाच्या या व्हिडीओत धोनीचे यंदाच्या हंगामातील खास क्षण दाखवण्यात आले आहेत. हा व्हिडीओ अल्पावधीत व्हायरल झालाय. त्यानंतर धोनी निवृत्त होणार का? असा सवाल चाहत्यांना पडलाय. सोशल मीडियावर तशी चर्चाही सुरु आहे. 


तीन वर्षांपूर्वीच एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेतली होती. धोनीने अचानक निवृत्तीची घोषणा घेत सर्वांनाच धक्का दिला होता. त्यानंतर आयपीएलमध्ये धोनी खेळत आहे. धोनी आयपीएलमधूनही निवृत्ती घेणार, या चर्चेला उधाण आलेय. आयपीएलच्या सोळाव्या हंगामाच्या फायनल सामन्यादरम्यान धोनीने निवृत्ती वक्तव्य करत पूर्णविराम दिला होता. पुढील हंगामात खेळायचे की नाही, याचा निर्णय घेण्यासाठी माझ्याकडे सात ते आठ महिन्याचा कालावधी आहे. 


पाहा व्हिडीओ






सोळाव्या हंगामात धोनीची कामगिरी -


आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील 16 सामन्यापैकी धोनी 12 डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. यामध्ये आठवेळा तो नाबाद राहिला. धोनीने 12 डावात 104 धावा केल्या. यामध्ये नाबाद 32 ही त्याचे सर्वोच्च धावसंख्या आहे. धोनीने यंदा 10 षटकात आणि तीन चौकार लगावले. 


आयपीएलनंतर गुडघ्यावर शस्त्रक्रिया -


आयपीएलच्या सोळाव्या हंगामात धोनी दुखापत झाली होती. गुडघ्याच्या दुखापतीनंतरही धोनी आयपीएलमध्ये खेळत होता. आयपीएलच्या सोळाव्या हंगामानंतर धोनीने मुंबईमध्ये शस्त्रक्रिया केली. मोहम्मद कैफ याने विमानतळावरील धोनीसोबतचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले होते. दुखापतीमुळे धोनी आयपीएलच्या सोळाव्या हंगामात फलंदाजी करायला तळाला येत होता. आयपीएल संपताच धोनीने गुडघ्याचे ऑपरेशन केले, ते यशस्वी झालेय. धोनीची प्रकृती सध्या चांगली आहे.


आणखी वाचा :


2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी20, टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर 


WTC मधील पराभवानंतर राहुल द्रविडला Warning, बीसीसीआय मोठा निर्णय घेणार ?