Tushar deshpande : ऋतुराज गायकवाड याच्यानंतर चेन्नईच्या आणखी एका खेळाडूंनी चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. तुषार देशपांडे याने गुपचूप साखरपुडा उरकलाय. साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चेन्नईने पाचव्यांदा चषकावर नाव कोरले, यामध्ये मराठमोळ्या खेळाडूंचा सिंहाचा वाटा राहिलाय. यामध्ये तुषार देशपांडे याच्या नावाचाही समावेश आहे. तुषार देशपांडे याने आयपीएलचा सोळावा हंगाम संपताच साखरपुडा उरकलाय. संघातील सहकारी शिवम दुबे याने साखरपुड्याला हजेरी लावली होती. दुबे याने पोस्ट केलेला फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. 


चेन्नईचा विस्फोटक फलंदाज शिवम दुबे याने इन्स्टा पोस्ट टाक तुषारला शुभेच्छा दिल्या. अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून दुबेने तुषारच्या साखरपुड्याची स्टोरी शेअर केली. फोटोत शिबम दुबे आणि त्याची पत्नी अंजूम खान जोडप्यासोबत दिसत आहेत. “अभिनंदन तुषार आणि नभा”, असे कॅप्शनमध्ये म्हटलेय. 


साखरपुड्याचे फोटो समोर येताच सीएसकेच्या चाहत्यांनी तुषारला साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येतोय. आयपीएलच्या 16 व्या हंगामात तुषारने प्रभावी कामगिरी केली, तो पर्पल कॅपच्या शर्यतीत सहाव्या क्रमांकावर होता. तुषारनं यंदाच्या हंगामात चेन्नईकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. तुषार देशपांडेनं 16 सामन्यांमध्ये 21 विकेट्स घेत आपली छाप सोडली. सुरुवातीला तुषार देशपांडे महागडा ठरत होता. पण स्पर्धा उत्तार्धाकडे गेल्यानंतर तुषारने धावाही रोखल्या. महत्वाच्या सामन्यात तुषारने चेन्नईसाठी दमदार कामगिरी केली.