WI vs IND 2023 schedule : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील पराभवाला मागे टाक टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. जुलै महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याचे अधिकृत वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केलेय. 12 जुलै ते 13 ऑगस्ट यादरम्यान टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी20 सामने खेळणार आहे. महिनाभर टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये मुक्कामी असणार आहे. विंडीज दौरा भारताच्या पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलची सुरुवात देखील करेल. याबरोबरच टीम इंडियाला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची तयारी करण्याची संधी मिळणार आहे.
वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर अनेक दिग्गज खेळाडूंना आराम दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जाडेजा आणि अश्विन यासारख्या सिनिअर खेळाडूंना आराम मिळण्याची शक्यता आहे. यशस्वी जायस्वाल, अक्षर पटेल, ईशान किशन यांच्यासह काही नव्या दमाच्या खेळाडूंना संघात स्थान मिळू शकते.
सामन्याची वेळ काय ?
भारतीय वेळेनुसार, कसोटी सामने संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहेत. तर एकदिवसीय सामने सात वाजता सुरुवात होणार आहेत. टी20 सामन्याला रात्री 8 वाजता सुरु होणार आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक -
कसोटी सामने (संध्याकाळी साडेसात वाजता)
12 ते 16 जुलै 2023 - पहिला कसोटी सामना
ठिकाण - विंडसर पार्क, डोमिनिका
20 ते 24 जुलै 2023 - दुसरा कसोटी सामना
ठिकाण - क्विन्स पार्क ओव्हल पोर्ट , त्रिनिदाद
वनडे सामने - (संध्याकाळी सात वाजता)
27 जुलै 2023 - पहिला एकदिवसीय सामना
ठिकाण - किंग्सटन, ओव्हल बारबाडोस
29 जुलै 2023 - दुसरा एकदिवसीय सामना
ठिकाण - किंग्सटन, ओव्हल बारबाडोस
1 ऑगस्ट 2023 - तिसरा एकदिवसीय सामना
ब्रायन लारा क्रिकेट अॅकेडमी, त्रिनिदाद
टी 20 सामने (संध्याकाळी 8 वाजता)
3 ऑगस्ट 2023 - पहिला टी20 सामना
ब्रायन लारा क्रिकेट अॅकेडमी, त्रिनिदाद
6 ऑगस्ट 2023 - दुसरा टी20 सामना
नॅशनल स्टेडिअम, गयाना
8 ऑगस्ट 2023 - तिसरा टी20 सामना
नॅशनल स्टेडिअम, गयाना
12 ऑगस्ट 2023 - चौथा टी20 सामना
सेन्ट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम, फ्लोरिडा
13 ऑगस्ट 2023 - पाचवा टी20 सामना
सेन्ट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम, फ्लोरिडा