IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील नवव्या सामन्यात मुंबईचा संघ राजस्थानशी भिडणार आहे. हा सामना मुंबईच्या डी वाय स्टेडियमवर खेळला जाणार आहे.  आयपीएलच्या सुरुवातीपासून दोन्ही संघ एकाच मैदानावर सराव करत आहे. दोन्ही संघाचा या हंगामातील दुसरा सामना असेल. राजस्थाननं त्यांच्या पहिल्या सामन्यात हैदराबादविरुद्ध 61 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. तर, मुंबईला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाराला सामोरे जावा लागले होते. 


मुंबईनं पाच वेळा आयपीएलचे खिताब जिंकले आहेत. तर, राजस्थानच्या संघानं आयपीएलच्या पहिल्या हंगामात ट्रॉफी जिंकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. शेनवार्नच्या नेतृत्वात राजस्थाननं ही ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर राजस्थानच्या संघाला एकही ट्रॉफी जिंकता आली नाही. दोन्ही संघामध्ये आतापर्यंत आयपीएलचे 27 सामने खेळण्यात आले आहेत. यातील 14 मुंबईनं तर, 12 सामन्यात राजस्थानच्या संघानं विजय मिळवला आहे. या दोघांमधील एकच सामना अनिर्णित ठरला होता. या दोघांमधील सामन्याच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास यंदाचा सामना चुरशीचा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


मुंबईचा संघ- 
रोहित शर्मा , जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, ईशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, बसिल थम्पी, मुरुगन आश्विन, जयदेव उनाडकट, मयांक मार्कंडे, तिलक वर्मा, संजय यादव, जोफ्रा आर्चर, डॅनियल सॅम्स , टिमल मिल्स, टीम डेव्हिड, रिले मरेडिथ, मोहम्मद अर्शद खान.  


राजस्थान संघ-
संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, रवीचंद्रन आश्विन, ट्रेण्ट बोल्ट, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, प्रसिध कृष्णा, युजवेंद्र चहल, पराग रियान, केसी करिअप्पा, नवदीप सैनी, महिपाल लोमरोर , ओबेद मेकॉय, चामा मिलिंद, अनुनयसिंह.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha