IPL 2022 Points Table : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकाता संघाने दोन विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलेय. तर चेन्नई सुपरकिंग्स गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे. चेन्नईला आपल्या पहिल्या दोन सामन्यात एकही विजय मिळवता आला नाही.  याशिवाय पहिल्याच सामन्यात पराभव स्विकारणारा मुंबईचा संघही तळाशी आहे. मुंबई आणि चेन्नई यांची आयपीएलची सुरुवात निराशाजनक झाली आहे. 

चेन्नई, मुंबई आणि हैदराबाद हे संघ गुणतालिकेच्या तळाशी आहेत. या संघाला अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही. कोलकाता संघाने तीन सामन्यात दोन विजय मिळवले आहेत. कोलकाता संघाच्या नावावर चार गुण आहेत. तर पंजाब संघाला दोन सामन्यात एक विजय एक पराभव स्विकारावा लागला आहे. 

पाहा गुणतालिका -

POS TEAM PLD WIN LOST TIED N/R NET RR PTS  
1. कोलकाता 3 2 1 0 0 +0.843 4  
2. राजस्थान 1 1 0 0 0 +3.050 2  
3. दिल्ली 1 1 0 0 0 +0.914 2  
4. गुजरात 1 1 0 0 0 +0.286 2  
5. लखनौ 2 1 1 0 0 -0.011 2  
6. बेंगलोर 2 1 1 0 0 -0.048 2  
7. पंजाब 2 1 1 0 0  -1.183 2  
8. चेन्नई 2 0 2 0    -0.528 0  
9. मुंबई 1 0 1 0 0 -0.914 0  
10. हैदराबाद 1 0 1 0 0 -3.050 0  

दरम्यान, ऑरेंज आणि पर्पल कॅप कोलकात्याच्या खेळाडूकडे आहे. आंद्रे रसेलकडे ऑरेंज कॅप आहे तर उमेश यादवकडे पर्पल कॅप आहे. 

 आंद्रे रसेलने तीन सामन्यातील दोन डावात फलंदाजी करताना 95 धावा चोपल्या आहेत. आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा चोपणाऱ्यांमध्ये रसेल पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर फाफ डु प्लेसिस आहे. डु प्लेसिसच्या नावार 93 धावा आहेत. तर इशान किशन 81 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर रॉबिन उथप्पा 78 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. गोलंदाजीत उमेश यादव पहिल्या क्रमांकावर आहे. उमेश यादवने तीन सामन्यात 8 विकेट घेत पर्पल कॅप आपल्या नावावर केली आहे. तर टीम साऊथी पाच विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. वानंदु हसरंगा पाच विकेटसह तिसऱ्या क्रमांकाव आहे. तर ब्राव्हो चार विकेटसह चौथ्या क्रमांकावर आहे.