IPL 2022, KKR vs PBKS Match Highlights : उमेशचा भेदक मारा, रसेलची वादळी खेळी, कोलकात्याचा पंजाबवर सहा गडी राखून विजय

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates :  रसेलच्या वादळी खेळीपुढे पंजाबचा धुव्वा, कोलकात्याचा सहा विकेटनं विजय

नामदेव कुंभार Last Updated: 01 Apr 2022 10:44 PM
IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates : उमेशचा भेदक मारा, रसेलची वादळी खेळी, कोलकात्याचा पंजाबवर सहा गडी राखून विजय

IPL 2022, KKR vs PBKS  : उमेश यादवचा भेदक मारा आणि त्यानंतर अंद्रे रसेलने केलेल्या वादळी खेळीच्या बळावर कोलकाता संघाने पंजाबचा सहज पराभव केला आहे.  कोलकाताने पंजाबवर सहा गड्याने विजय मिळवला आहे. पंजाबने दिलेले 138 धावांचे आव्हान कोलकाताने 33 चेंडू आणि सहा गडी राखून पार केले. कोलकात्याचा या हंगामातील दुसरा विजय आहे. 

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates : रसल-बिलिंग्सने डाव सावरला
IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates : रसल-बिलिंग्सने डाव सावरला
IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates : रसल-बिलिंग्सने डाव सावरला
IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates : रसल-बिलिंग्सने डाव सावरला
IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates : राहुल चाहरचा भेदक मारा, कोलकात्याला चौथा धक्का

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates : राहुल चाहरने श्रेयस अय्यरनंतर नितेश राणालाही बाद करत पंजाबला चौथं यश मिळवून दिले. कोलकाता नाईट रायडर्स ला 78 चेंडूत 6.69 rpo प्रति ओवर सरासरी ने 87 धावांची गरज



 

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates : कोलकात्याला तिसरा धक्का, अय्यर बाद

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates : कोलकात्याला तिसरा धक्का, अय्यर बाद, कोलकाता नाईट रायडर्स ला 78 चेंडूत 6.69 rpo प्रति ओवर सरासरी ने 87 धावांची गरज

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates : 137 धावांवर पंजाबचा डाव संपुष्टात

  IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates : 137 धावांवर पंजाबचा डाव संपुष्टात

 IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates :  पंजाबला नववा धक्का, रसलने घेतली विकेट

 IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates :  कगिसो रबाडाला बाद करत रसलने पंजाबला नववा धक्का दिला. रबाडाने 25 धावांची खेळी केली.

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates : उमेश यादवने पंजाबला दिला सातवा धक्का

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates :  उमेश यादवने हरप्रीत बारला बाद करत पंजाबला सातवा धक्का दिला. पंजाब 14.2 षटकांत सात बाद 102 धावा

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates : पंजाबला सहावा धक्का, शाहरुख खान बाद

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates : साऊदीने शाहरुख खानला नितेश राणाकरवी झेलबाद करत पंजाबला सहावा धक्का दिला आहे. पंजाबने 12.2 षटकांत सहा बाद 92 धावा केल्या आहेत. 

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates : पंजाबची फलंदाजी कोलमडली

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates : वादळी सुरुवातीनंतर पंजाबचा डाव कोलमडला आहे. शाहरुख खान आणि हरप्रीत सध्या खेळत आहेत. 12 षटकानंतर पंजाबच्या पाच बाद 92 धावा

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates : पंजाबची प्लेईंग 11 - 

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates :  मयांक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, भानका राजपक्षे, राज बावा, शाहरुख खान, ओडिन स्मिथ, हरप्रीत बार, अर्शदीप सिंह, राहुल चहल, कगिसो रबाडा

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates : नाणेफेक महत्वाची, कारण...

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates :  आयपीएलच्या 15 व्या हंगमाता नाणेफेकीनं महत्वाची भूमिका बजावली आहे. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहे. आतापर्यंत झालेल्या सात सामन्यापैकी सहा सामन्यात दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्वाचा आहे. 

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates : थोड्याच वेळात होणार नाणेफेक

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates :  थोड्याच वेळात होणार नाणेफेक, कुणाच्या बाजूने कौल 





IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates : कोलकाता विरुद्ध पंजाब, पिच रिपोर्ट

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates : मुंबईच्या वानखडे मैदानात हा सामना असून आजही याठिकाणी फलंदाजाना अधिक फायदा होणार आहे. त्यात सामना संध्याकाळी असल्याने दव पडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ नक्कीच आधी गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेऊ शकतो.

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates : आतापर्यंतचा सर्वोच्च आणि सर्वात कमी स्को

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates : कोलकाता संघाने पंजाब किंग्सविरुद्ध सर्वाधिक म्हणजे 245 धावा केल्या आहेत. तर पंजाबने सर्वाधिक म्हणजे 214 धावा केकेआरविरुद्ध ठोकल्या आहेत. केकेआरकडून सर्वात कमी म्हणजे 109 रन त्यांनी पंजाबविरुद्ध केले आहेत. तर पंजाबचा केकेआरविरुद्धचा सर्वात कमी स्कोर 119 रन इतका आहे.

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates : कोलकाता विरुद्ध पंजाब Head to Head

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates :  आयपीएलमध्ये आजवर कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्या एकमेंकाविरुद्धच्या सामन्यांचा विचार करता दोन्ही संघानी आजवर 29 सामने एकमेंकाविरुद्ध खेळले आहेत. यामध्ये कोलकाता संघाचं पारडं बऱ्यापैकी जड असून त्यांनी पंजाबविरुद्ध अधिक विजय मिळवले आहेत. केकेआरने 19 सामन्यात पंजाबला मात दिली आहे. तर दुसरीकडे पंजाबने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आज केकेआरचं जिंकणार की पंजाब दम दाखवणार हे पाहावे लागेल.

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates : कधी आहे सामना?

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates : आज 1 एप्रिल रोजी होणारा हा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.

पार्श्वभूमी

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates :  आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्सने विजयाने केली होती. पण दुसऱ्या सामन्यात बंगळुरु संघाने त्यांना 3 विकेट्सने मात दिली. दुसरीकडे पंजाब आपला एकच सामना खेळली असून त्यांनी त्यात दमदार विजय मिळवत बंगळुरु संघाला 5 विकेट्सने मात दिली. त्यामुळे आज हे दोन्ही संघ विजयासाठी मैदानात प्रयत्नांची शिकस्त करतील हे नक्की. 


दोन्ही संघाची ताकद काय?
पंजाब संघाची सर्वात जमेची बाजू पाहिली तर फलंदाजीच आहे. मयांक सारखा दमदार सलामीवीर असताना त्याला जोडीला डावखुरा सलामीवीर शिखर धवन संघात आहे. या दोघांमुळे संघाचा आत्मविश्वास खूप वाढला आहे. त्यानंतर जॉनी, भानुका, शाहरुख, लियाम या धाकड फलंदाजांमुळे समोरच्या संघातील गोलंदाजांना धडकी नक्कीच भरेल. केकेआर संघाचा विचार करता त्यांची सर्वात मोठी ताकद त्यांचे अष्टपैलू खेळाडू आहे. यात स्टार आंद्रे रस्सेलसोबत नवखा पण दमदार वेंकटेश अय्यर आहे. सुनील नारायण, मोहम्मद नबी, सॅम बिलिंग्स यांच्या जोडीला असल्याने संघ अष्टपैलू कामगिरी उत्तम करु शकेल. त्यामुळे संघात मधली आणि धडाकेबाज सलामीवीरांची भूमिका उत्तम असेल हे नक्की.


कोलकाता विरुद्ध पंजाब Head to Head
आयपीएलमध्ये आजवर कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्या एकमेंकाविरुद्धच्या सामन्यांचा विचार करता दोन्ही संघानी आजवर 29 सामने एकमेंकाविरुद्ध खेळले आहेत. यामध्ये कोलकाता संघाचं पारडं बऱ्यापैकी जड असून त्यांनी पंजाबविरुद्ध अधिक विजय मिळवले आहेत. केकेआरने 19 सामन्यात पंजाबला मात दिली आहे. तर दुसरीकडे पंजाबने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आज केकेआरचं जिंकणार की पंजाब दम दाखवणार हे पाहावे लागेल.


कोलकाता नाईट रायडर्सचा संघ -
आंद्रे रस्सेल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), वेंकटेश अय्यर (8 कोटी), सुनील नारायण (6 कोटी), पॅट कमिन्स (7.25 कोटी), श्रेयस अय्यर (12.25 कोटी), नितीश राणा (8 कोटी), शिवम मावी (7.25 कोटी), शेल्डन जॅकसन (60 लाख), अजिंक्य रहाणे (1 कोटी), रिंकू सिंह (55 लाख), अनुकूल रॉय (20 लाख), रसिक डार (20 लाख), बाबा इंद्रजीत (20 लाख), चमिका करुणारत्ने (50 लाख), प्रथम सिंह (20 लाख), अभिजीत तोमर (40 लाख), अशोक शर्मा (55 लाख), सॅम बिलिंग्स (2 कोटी), आरॉन फिंच (1.5 कोटी), टीम साऊदी (1.5 कोटी), रमेश कुमार (20 लाख), मोहम्मद नबी (1 कोटी), उमेश यादव (2 कोटी), अमान खान (20 लाख)  


पंजाब किंग्सचा संघ - 
मयांक अगरवाल (कर्णधार) (12 कोटी),अर्शदीप सिंह (4 कोटी), शिखर धवन (8.25 कोटी),कागिसो रबाडा (9.25 कोटी), जॉनी बेअरस्टो (6.75 कोटी), शाहरुख खान (9 कोटी), राहुल चहर (5.25 कोटी), हरप्रीत ब्रार (3.8 कोटी), प्रभसिमरन सिंह (60 लाख), जितेश शर्मा (20 लाख), इशान पोरेल (25 लाख), लियाम लिव्हिंगस्टोन (11.5 कोटी), ओडियन स्मिथ (6 कोटी), संदीप शर्मा (50 लाख), राज बावा (2 कोटी), ऋषी धवन (55 लाख), प्रेरक मंकड (20 लाख), वैभव अरोरा (2 कोटी), आर. चॅटर्जी (20 लाख), बलतेज सिंह (20 लाख), अंश पटेल (20 लाख), नॅथन एलिस (75 लाख), अथर्व तायडे (20 लाख), बेनी हॉवेल (40 लाख), भानुका राजपक्षे (50 लाख).

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.