मुंबई: मुंबई इंडियन्सं गेल्या चार वर्षांपासूनचा आयपीएल विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्यानं संघात फेरबदल केले. मात्र, मुंबई इंडियन्सला त्या बदलांचा फायदा होण्याऐवजी नुकसान झालं. मुंबई इंडियन्स सर्वप्रथम प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली.आता मुंबई इंडियन्सची अखेरच्या मॅचमध्ये लखनौ सुपर जाएंटस विरोधात लढत होणार आहे. एलएसजीवर विजय मिळवून शेवट गोड करण्याचा प्रयत्न मुंबई इंडियन्सचा आहे. 


मुंबई इंडियन्सचा शेवटच्या मॅचमध्ये विजय मिळवून गुणतालिकेत किमान शेवटच्या स्थानी राहू नये असा प्रयत्न आहे. यासाठी मुंबईला लखनौला पराभूत करावं लागेल त्यासोबतच पंजाब किंग्जला देखील त्यांच्या शेवटच्या मॅचमध्ये पराभूत व्हावं लागेल.  


कॅप्टन हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्यातील मतभेदांमुळं मुंबईची ड्रेसिंग रुम दोन गटात विभागली गेल्याच्या चर्चा झाल्या होत्या.. गुजरात टायटन्सचं करणाऱ्या हार्दिक पांड्याला माघारी आणून त्याला कॅप्टन्सी देण्याचा निर्णय देखील मुंबईच्या चाहत्यांना पटलेला नव्हता. 


मुंबई इंडियन्समध्ये दोन गट


दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांचे दोन गट मुंबईच्या संघात पडले आहेत. मुंबई इंडियन्समधील भारतीय खेळाडू रोहित शर्माच्या बाजून आहेत. तर, विदेशी खेळाडूंचा पाठिंबा हार्दिक पांड्याला आहेत. मुंबईच्या संघात देखील नामवंत परकीय खेळाडू नसल्यानं या वादात त्यांची फारशी चर्चा होत नाही. 


ऑस्ट्रेलियाचा खेळाडू टिम डेविड यानं हार्दिक पांड्यांचं कौतुक केलं होतं. हार्दिक पांड्या मुंबईच्या टीमचा ग्लू असल्याचं तो म्हणाला होता.याशिवाय त्यानं हार्दिकच्या खेळाचं कौतुक देखील केलं होतं. 


काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा हे हार्दिकला पाहताच निघून गेल्याचा व्हिडीओ समोर आला होता. 


दरम्यान, हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा या दोघांची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी समाधानकारक राहिलेली नाही. रोहित शर्मानं एक शतक झळकावलं होतं. मात्र, नंतरच्या पाच डावांमध्ये त्याला दोन अंकी संख्या गाठता आली नव्हती.


पाचवेळा विजेतेपद, गेल्या चार वर्षांपासून संघर्ष


मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जनं आतापर्यंत पाचेवळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील मुंबई इंडियन्सनं पाचवेळा विजेतेपद पटकावलं होतं. मुंबईनं शेवटचं विजेतेपद 2020 मध्ये विजय मिळवला होता. यंदाचं आयपीएल आणि यापूर्वीच्या तीन स्पर्धांमध्ये मुंबई इंडियन्सला नावलौकिकाप्रमाण कामगिरी करता आलेली नाही. 


संबंधित बातम्या :


Virat Kohli Video: 'नंतर तुम्ही मला पाहू शकणार नाही...', विराट कोहलीच्या सूचक वक्तव्यानं चाहते भावनिक, पाहा व्हिडीओ


Yuzvendra Chahal : ये चिंटू, ये रियान थांब, युजवेंद्र चहल  बनला फोटोग्राफर, पत्नी धनश्रीची भन्नाट कमेंट चर्चेत