Virat Kohli Emotional Statement बंगळुरु: विराट कोहली (Virat Kohli) यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) भन्नाट फॉर्ममध्ये आहे. आयपीएलचं हे पर्व त्याच्यासाठी शानदार ठरलं आहे. कोहलीनं  13 मॅचेसमध्ये 661 धावा केल्या असून तो ऑरेंज कॅपचा मानकरी देखील आहे. 2016 च्या आयपीएलमध्ये विराटनं 973 धावा केल्या होत्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) स्पर्धेत कमबॅक केलं आहे. सलग पाच मॅच जिंकत आरसीबीनं प्लेऑफ प्रवेशाच्या आशा जिवंत ठेवल्यात. या पार्श्वभूमीवर विराट कोहलीच्या एका वक्तव्यामुळं चाहत्यांचं टेन्शन वाढलंय.

  


विराट कोहलीनं त्याच्या निवृत्तीबाबत वक्तव्य केलंय. आरसीबीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ही पोस्ट करण्यात आली आहे. विराट कोहली त्यामध्ये त्याचं करिअर कधी संपवणार याबाबत बोलत आहे. कोहली म्हणाला की तो कायमस्वरुपी खेळू शकत नाही. त्यामुळं अशी कोणती गोष्ट सोडायची नाही, ज्यामुळं नंतर पश्चाताप होईलं, असं कोहली म्हणाला.   


विराट काय म्हणाला पाहा? 






आरसीबीनं शेअर केलेल्या निवेदकानं कोहलीला विचारलं की, बदलत्या खेळाता विराट तुला कोणती गोष्ट पुढं जाण्यासाठी उत्सुक ठेवत, तू प्रत्येक मॅचमध्ये चांगली कामगिरी कशी करु शकतो, प्रत्येक मॅचमध्ये तू तुझा बेस्ट कसा देतो, असे प्रश्न विचारले. विराट कोहलीनं याचं उत्तर देताना म्हटलं की, स्पोर्ट्समनच्या रुपात आमचं करिअर संपत असतं, त्यामुळं काम करतोय, मला असा विचार करत करिअर संपवायचं नाही की मी पुन्हा विचार करावा असं करायला हवं तसं करायला हवं होतं, असं कोहली म्हणाला  "


किंग कोहली पुढं म्हणाला की, "मला माझ्यासाठी क्रिकेटमध्ये कोणतंही काम अपूर्ण सोडायचं नाही आणि नंतर पश्चाताप देखील करायचा नाही. एकदा माझं क्रिकेट खेळणं पूर्ण झालं की मी निघून जाईन, तुम्ही काही काळासाठी मला पाहू देखील शकणार नाही. मी जोपर्यंत खेळतोय तोपर्यंत माझ्याकडे जे आहे ते सर्वकाही देण्याचा प्रयत्न करेन. ही मोठी गोष्ट आहे, जी मला पुढं जाण्यासाठी प्रवृत्त करते, असं कोहली म्हणाला. 


विराटचे चाहते भावनिक


विराट कोहलीच्या या वक्तव्यानं त्याचे चाहते भावूक झाले आहेत. एका चाहत्यानं कमेंट करत माझी झोप उडेल, विराट तू क्रिकेट खेळणं बंद करु नको, असं म्हटलं. किंग कोहली तुझं असणं महत्त्वाचं आहे, 2027 पर्यंत तू खेळायला हवं, अशी कमेंट एका चाहत्यानं दिली. 


संबंधित बातम्या :



Irfan Pathan : संपूर्ण सीझन खेळायचं असेल तर या अन्यथा येऊच नका, आयपीएल अर्ध्यात सोडणाऱ्यांवर इरफान भडकला