गुवाहाटी : आयपीएलमध्ये (IPL 2024) काल राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यातील मॅच गुवाहाटी येथे पार पडली. पंजाब किंग्जनं या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सला पाच विकेटनं पराभूत केलं. राजस्थाननं युजवेंद्र चहलचा (Yuzvendra Chahal) एक व्हिडीओ शेअर केला होता.ज्यामध्ये युजवेंद्र चहल फोटोग्राफर बनल्याचं पाहायला मिळतं. तुमच्या ग्रुपमध्ये असा एक कोणतरी असतो, असं कॅप्शन राजस्थाननं दिलं आहे. 


राजस्थान रॉयल्सचा स्पिनर युजवेंद्र चहल कालच्या मॅचपूर्वी फोटोग्राफर झाल्याचं पाहायला मिळालं. युजवेंद्र चहलनं पंजाब किंग्ज विरुद्धच्या मॅचपूर्वी कॅमेरा हातात घेत टीम मेंबर्सचे फोटो काढण्याचं काम केलं. 


राजस्थाननं तुमच्या गटात असा कोणतरी एकजण असतो, असं म्हणत युजवेंद्र चहलचा व्हिडीओ शेअर केलाय. युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा हिनं देखील या व्हिडीओवर कमेंट केली आहे. तिनं "ट्रेनड बाय द बेस्ट" असं कॅप्शन दिलं आहे.






चहलनं कॅमेरा हातात घेतल्यानंतर ये चिंटू, हॅलो, टॅटू गाय असं म्हणत रियान परागला फोटोसाठी हाका मारल्या. मात्र, रियान परागनं चहलकडे लक्ष दिलं नाही. अखेर रियान म्हटल्यानंतर त्यानं चहलची विनंती मान्य करत फोटोसाठी स्पेशल पोझ दिली.


युजवेंद्र चहलनं यानंतर टॉम कोह्लर कॅडमोरचा फोटो काढला. यानंतर त्यानं प्रशिक्षकांचे फोटो देखील काढले.


चहलच्या फोटोग्राफीवर नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्यानं चहल वेगवेगळी काम करु शकतात. गोलंदाज, बटलरच्या जागी सलामीवर, फोटो ग्राफर, मीमर आणि इन्स्टाग्रामर, रिपोर्टर बनू शकतो, असं म्हटलं. 


राजस्थानचा सलग चौथा पराभव


राजस्थान रॉयल्सनं स्पर्धेच्या सुरुवातीला दमदार कामगिरी केली होती. राजस्थाननं पहिल्या नऊ मॅचमध्ये केवळ एका मॅचमध्ये पराभव स्वीकारला होता. तर, राजस्थाननं आठ मॅचमध्ये विजय मिळवला होता. त्यानंतरच्या पुढील चार मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सला पराभव स्वीकारावा लागला आहे. प्लेऑफमधील स्थान निश्चित झालं असलं तरी सलग चार पराभवामुळं राजस्थान गुणतालिकेत तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


संबंधित बातम्या : 


राजस्थानचा सलग चौथा पराभव, पंजाबने 5 विकेटनं लोळवलं, सॅम करनचे अर्धशतक


IPL 2024 Playoffs : 4 दिवस, 5 संघ अन् 2 जागा... प्लेऑफचं समीकरण सोप्या भाषेत