Ishan Kishan : आयपीएल 2022 साठी मुंबई इंडीयन्सने आपली संघबांधणी जोरदार केली असून त्यांनी दुसऱ्या दिवशीच्या लिलावादरम्यान काही मोठे डाव खेळले आहेत. पण पहिल्या दिवशी त्यांनी खरेदी केलेला त्यांच्याच आधीचा खेळाडू इशान किशन (Ishan Kishan) यंदाच्या लिलावातील अजूनही सर्वात महागडा खेळाडू आहे. दरम्यान त्यांनी केलेल्या या अपेक्षित खरेदीनंतर त्यांनी इशानचा झिंगाट गाण्यातील एक डान्स इन्स्टावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये इशान जोरदार डान्स करताना दिसत आहे. दरमयान मुंबईने ईशान किशनसाठी तब्बल 15.25 कोटी रुपये मोजले आहेत. 



आयपीएल लिलावाच्या इतिहासात ईशान किशन सर्वाधिक बोली लागणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. या यादीत युवराज सिंह पहिल्या क्रमांकावर आहे. युवराज सिंहवर 16 कोटींची बोली लागली होती. ईशान किशनवर मुंबई इंडियन्स संघाने तब्बल 15.25 कोटी रुपयांची बोली लावली आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाने लावलेली ही सर्वाधिक बोली आहे. आयपीएल लिलावाच्या इतिहासात मुंबईने 10 कोटींपेक्षा जास्त बोली कधीही लावली नव्हती. 


मुंबईला मिळाली हार्दीकची रिप्लेसमेंट


जोफ्रा आर्चरवर 8 कोटी खर्च केल्यानंतर मुंबईने अष्टपैलू हार्दीक पंड्याला रिप्लेसमेंट म्हणून तब्बल 8.25 कोटी खर्च करत एक अष्टपैलू खेळाडू ताफ्यात घेतला आहे. हा खेळाडू म्हणजे सिंगापूरचा युवा अष्टपैलू खेळाडू टीम डेविड (TIim David). टीम याच्यावर अवघ्या 40 लाखांची बेस प्राईस लावण्यात आली होती. ज्यानंतर केकेआर, मुंबईसारख्या संघानी त्याच्यावर बोली लावण्यास सुरुवात केली. पण सर्वाधिक पैसे बटव्यात उरलेल्या मुंबईने टीमला 8.25 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामिल केले. मुंबईने यंदा त्यांचा हुकुमी एक्का हार्दीक पंड्या याला गमावलं होतं. हार्दीक गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार असून त्याच्यासारखा एक धाकड अष्टपैलू खेळाडू मुंबईला हवा होता. त्यामुळेच त्यांनी तब्बल 6.5 फुट उंचीचा युवा खेळाडू टीम डेविडला संघात सामिल करुन घेतलं आहे. 


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha