IPL Auction 2022 Highlights : आयपीएल (IPL 2022) साठी मेगा लिलाव बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी अनेक मोठ्या खेळाडूंशिवाय अनेक फ्रँचायझींनी अनकॅप्ड खेळाडूंवर बाजी मारली. मेगा लिलावात अशा अनेक खेळाडूंचे नशीब चमकले. भारतीय क्रिकेट अभिनव मनोहर सदरंगानीचे नशीबही लिलावात चमकले. अभिनव मनोहरला गुजरात टायटन्सने 2.60 कोटींच्या बोलीवर विकत घेतले आहे. विशेष म्हणजे, अभिवनची मूळ किंमत फक्त 20 लाख रुपये होती, परंतु अनेक संघांनी त्याला विकत घेण्यासाठी बोली लावली अखेर गुजरात टायटन्सने अभिनव मनोहरवर शिक्कामोर्तब केला.


कोण आहेत अभिनव मनोहर ?
अभिनव कर्नाटकातील बंगलोरचा आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या नुकत्याच झालेल्या हंगामात या 27 वर्षीय क्रिकेटपटूने पदार्पण केले आहे. तो अजूनही त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. अभिनव हा उजव्या हाताचा फलंदाज आणि लेग ब्रेक स्पिनर आहे, तो त्याच्या वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जातो. अनेक लोक त्याची तुलना स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्यासोबत करतात. त्याची खेळण्याची शैली हार्दिक पांड्यासारखीच स्फोटक आहे. यामुळेच तो आयपीएलसाठी चांगला खेळाडू मानला जातो.


केवळ चार सामन्यांनी नशीब बदलले


देशांतर्गत क्रिकेटमधील अभिनवची कारकीर्दही अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर असून आतापर्यंत तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये केवळ चार सामने खेळला आहे. मात्र, या चार सामन्यांमध्ये त्याने आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांनाच चकित केले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या चार सामन्यांमध्ये अभिनव मनोहरने उत्कृष्ट सरासरीने 162 धावा करून दहशत निर्माण केली. विशेष म्हणजे त्याने एका सामन्यात अर्धशतकही ठोकले. त्याने चार सामन्यात 11 चौकार आणि 11 षटकार मारून स्वतःला सिद्ध केले. त्यामुळेच त्याला लिलावात चांगली रक्कम मिळाली.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha