IPL Auction 2022 Updates: आयपीएलच्या (IPL) इतिहासात सर्वाधिक वेळा ट्रॉफी उचलणारा संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यंदाच्या वर्षी पहिल्या महालिलावात (IPl Auction) पहिल्या दिवशी काहीसा शांत दिसून आला. ईशान किशन सोडता अधिक कोणताच मोठा डाव त्यांनी यावेळी खेळला नाही. पण दुसऱ्या दिवशी आधी जोफ्रा आर्चरवर 8 कोटी खर्च केल्यानंतर आता त्यांनी अष्टपैलू हार्दीक पंड्याला रिप्लेसमेंट म्हणून तब्बल 8.25 कोटी खर्च करत एक अष्टपैलू खेळाडू ताफ्यात घेतला आहे. हा खेळाडू म्हणजे सिंगापूरचा युवा अष्टपैलू खेळाडू टीम डेविड (TIim David).
टीम याच्यावर अवघ्या 40 लाखांची बेस प्राईस लावण्यात आली होती. ज्यानंतर केकेआर, मुंबईसारख्या संघानी त्याच्यावर बोली लावण्यास सुरुवात केली. पण सर्वाधिक पैसे बटव्यात उरलेल्या मुंबईने टीमला 8.25 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामिल केले. मुंबईने यंदा त्यांचा हुकुमी एक्का हार्दीक पंड्या याला गमावलं होतं. हार्दीक गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार असून त्याच्यासारखा एक धाकड अष्टपैलू खेळाडू मुंबईला हवा होता. त्यामुळेच त्यांनी तब्बल 6.5 फुट उंचीचा युवा खेळाडू टीम डेविडला संघात सामिल करुन घेतलं आहे.
ईशानवर लागली तगडी बोली
यंदाच्या हंगमात आतापर्यंत सर्वात महागडा खेळाडू युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन ठरला आहे. मुंबई इंडियन्स संघाने अपेक्षाप्रमाणे ईशान किशनला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. मुंबईने ईशान किशनसाठी तब्बल 15.25 कोटी रुपये मोजले आहेत. ज्यामुळे यंदाच्या आयपीएल लिलावात आतापर्यंत ईशान किशन सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. आयपीएल लिलावाच्या इतिहासात ईशान किशन सर्वाधिक बोली लागणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. या यादीत युवराज सिंह पहिल्या क्रमांकावर आहे. युवराज सिंहवर 16 कोटींची बोली लागली होती.
हे ही वाचा :
- IPL 2022 Mega Auction: बुमराहच्या जोडीला आणखी एक वर्ल्ड क्लास वेगवान गोलंदाज मुंबई इंडियन्समध्ये, 8 कोटींनी केलं खरेदी
- IPL 2022 Mega Auction: अंडर 19 विश्वचषक विजेत्या संघाच्या कर्णधारापेक्षा अधिक महाग हा खेळाडू, महाराष्ट्राचा आणखी एक खेळाडू चेन्नईमध्ये
- IPL Mega Auction Live Streaming Day 2: आयपीएल मेगा ऑक्शन 2022 लाईव्ह कधी, कुठे आणि कसं पाहायचं?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha