एक्स्प्लोर

आरंभ है प्रचंड... 2004 च्या लूकमध्ये धोनी, नेट्समध्ये केली फटकेबाजी

धोनीच्या चेन्नईमध्ये आणि विराट कोहलीच्या आरसीबीमध्ये (CSK vs RCB) सलामीची लढत होणार आहे. आयपीएलसाठी एमएस धोनीने (MS Dhoni) चेन्नईमध्ये कसून सराव सुरु केला आहे. धोनीच्या सरावाचे फोटो चेन्नईने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

MS Dhoni lands in Chennai ahead of IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा थरार दोन आठवड्यानंतर सुरु होणार आहे. 22 मार्चपासून आयपीएल (IPL 2024) स्पर्धेचा रनसंग्राम सुरु होणार आहे. धोनीच्या चेन्नईमध्ये आणि विराट कोहलीच्या आरसीबीमध्ये (CSK vs RCB) सलामीची लढत होणार आहे. आयपीएलसाठी एमएस धोनीने (MS Dhoni) चेन्नईमध्ये कसून सराव सुरु केला आहे. धोनीच्या सरावाचे फोटो चेन्नईने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनीनं चेपॉकवरील सराव शिबिरात भाग घेतला. यावेळी तो नेटमध्ये जुन्या लूकमध्ये दिसला. धोनीनं 2004 मध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा त्याचा लांब केसांचा लूक खूपच लोकप्रिय झाला होता. आगामी आयपीएलमध्ये धोनी पुन्हा एकदा त्याच लूकमध्ये दिसणार आहे. नेटमध्ये सराव करताना लांब केसांच्या धोनीनं खूप घाम गाळला.  

सीएसकेकडून आयपीएलसाठी प्री-सीजन ट्रेनिंग कॅम्पची सुरुवात करण्यात आली आहे. चेन्नईच्या संघातील काही खेळाडू कॅम्पमध्ये दाखल झाले. त्यामध्ये दीपक चाहर, ऋतुराज गायकवाड, सिमरजीत सिंह, राजवर्धन हंगरगेकर, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, अजय मंडल, शेख रशीद आणि निशांत सिंधू यांच्या नावाचा समावेश होता. चेन्नईच्या चमूसोबत धोनीही दाखल झालाय. चेन्नई 2024 च्या आयपीएल हंगामाची सुरुवात 22 मार्चपासून करणार आहे. चेन्नईचा पहिला सामना आरसीबीसोबत होणार आहे. त्याच्या तयारीसाठी चेन्नईच्या संघाने कंबर कसली आहे.

पाहा व्हिडीओ

आयपीएल 2024 च्या पहिल्या टप्प्यातील चेन्नईचं वेळापत्रक - 

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 22 मार्च, चेन्नई, रात्री 8 वाजता
 
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 26 मार्च, चेन्नई, संध्याकाळी 7.30 वाजता
 
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 31 मार्च, वाइजैग, संध्याकाळी 7.30 वाजता
 
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 5 एप्रिल, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजता 

Chennai Super Kings Players: यंदाच्या हंगामासाठी चेन्नईच्या ताफत कोण कोण?
अजय मंधवाल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेवॉन कॉनवे, महीश तिक्ष्णा, मथिशा पथिराणा, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी,मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगारकेकर, रविंद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड, शैख रशीद, शिवम दुबे, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे, डॅरेल मिचेल, समीर रिझवी, शार्दूल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, रचिन रविंद्र, अविनाश रॉय 

Chennai Super Kings Players: Ajay Mandal, Ajinkya Rahane, Deepak Chahar, Devon Conway, Maheesh Theekshana, Matheesha Pathirana, Mitchell Santner, Moeen Ali, MS Dhoni, Mukesh Choudhary, Nishant Sindhu, Prashant Solanki, Rajvardhan Hangargekar, Ravindra Jadeja, Ruturaj Gaikwad, Shaik Rasheed, Shivam Dube, Simarjeet Singh, Tushar Deshpande,  Daryl Mitchell,  Sameer Rizvi,  Shardul Thakur,    Mustafizur Rahman,  Rachin Ravindra ,  Avanish Rao Aravelly  

धोनीच्या चेन्नईनं पाचवेळा चषकावर नाव कोरलं - 
 
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने (CSK) आयपीएल 2023 चं विजेतपद पटकावत, पाचव्यांदा अजिंक्यपदाचा मान मिळवला होता. चेन्नईने अंतिम फेरीत हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. चेन्नईच्या रवींद्र जडेजाने  शेवटच्या षटकात एक षटकार आणि एक चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget