नवी दिल्ली : आयपीएलचं 17 वं पर्व मे महिन्याच्या अखेरीस संपणार आहे. आयपीएल (IPL 2024) संपल्यानंतर आयसीसी टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेसाठी गट अ मध्ये आहे. या गटात पाकिस्तान देखील आहे. आयसीसीच्या नियमानुसार 1 मे पूर्वी टीम इंडियाची घोषणा करावी लागणार आहे. भारतीय क्रिकेट खेळाडूंना आयपीएलनंतर टी-20 वर्ल्डकपच्या तयारीसाठी वेळ मिळणार नसल्यानं आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाची निवड केली जाण्याची शक्यता आहे. आयपीएलमधील कामगिरीचा निकष लावल्यास हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा या दोघांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. महेंद्रसिंह धोनीचा पठ्ठ्या या दोघांचा पत्ता कट करण्याची शक्यता आहे.

  
चेन्नई सुपर किंग्जचा ऑलराऊंडर शिवम दुबे याला आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर टी-20 वर्ल्ड कपचं तिकीट मिळू शकतं. शिवम दुबे आयपीएल  चांगली कामगिरी करतोय. टीम इंडियाचा  प्रमुख ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा या दोघांची कामगिरी चांगली झालेली नाही. दोघांचा ही फॉर्म खराब झालेली आहे. जडेजानं हार्दिक पांड्याच्या तुलनेत समाधानक कामगिरी केलेली आहे. हार्दिक पांड्याला फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळं शिवम दुबे टी-20 वर्ल्ड कपसाठी प्रमुख दावेदार मानलं जात आहे. 


शिवम दुबेची कामगिरी कशी राहिलीय (Shivam Dube IPL Performance)


शिवम दुबे यानं आयपीएलमध्ये 8 मॅच खेळलेल्या आहेत. दुबेनं आठ मॅचमध्ये 51.83 च्या सरासरीनं 169.95 च्या स्ट्राइक रेटनं 311 धावा केल्या. शिवम दुबनं तीन अर्धशतकं केली आहेत. मात्र, शिवम दुबेला आतापर्यंत बॉलिंगची संधी मिळालेली नाही. हीच बाब त्यासाठी अडचणीची ठरु शकते. 


हार्दिक पांड्या आणि जडेजाचा संघर्ष सुरु


मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्यानं यंदाच्या आयपीएलमध्ये 8 मॅच खेळल्या आहेत. या मॅचमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 39 धावा इतकी आहे. हार्दिक पांड्याला चार डावांमध्ये 15 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. गोलंदाजीमध्ये देखील हार्दिकच्या कामगिरीत सातत्य दिसून आलं नाही. काही मॅचमध्ये त्यानं बॉलिंग केलेली नाही. ज्या मॅचमध्ये हार्दिक पांड्यानं बॉलिंग केली त्यात तो प्रभाव पाडू शकला नाही. 


रवींद्र जडेजानं देखील यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करु शकला नाही. त्यानं केवळ एक अर्धशतक केलं आहे. त्याला इतर डावांमध्ये मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रवींद्र जडेजानं 8 मॅचमध्ये केवळ 4 विकेट घेतल्या आहेत. 


दरम्यान, टी-20 वर्ल्ड कपसाठी 1 मे पूर्वी भारतीय संघ जाहीर करावा लागणार आहे. 


संबंधित बातम्या : 



Rishabh Pant Video : रिषभ पंतचा मॅच जिंकल्यानंतर रिकी पाँटिंगच्या साक्षीनं ऑन कॅमेरा माफीनामा, मैदानावर काय घडलं?