Most Sixes In An Innings In IPL: आयपीएलचा पंधरावा हंगाम आता अखेरच्या टप्प्यावर पोहचला आहे.  लवकरच प्लेऑफमध्ये स्थान मिळवलेल्या संघाचं नाव स्पष्ट होईल. यंदाच्या हंगामातही धावांचा पाऊस पडला. तर, अनेक फलंदाजांनी उत्तुंग षटकार ठोकून खेळाडूंसह प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. याशिवाय, असेही काही खेळाडू आहेत. त्यांना या हंगामात एकही षटकार मारता आलेला नाही. विशेष म्हणजे, असे काही खेळाडू आहेत, ज्यांनी एकाच षटकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आयपीएलच्या इतिहासात आजही त्या खेळाडूंच्या विक्रमांची नोंद आहे. 


1) ख्रिस गेल- 17 षटकार
द युनिव्हर्स बॉस म्हणून प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलनं आयपीएलच्या 142 सामन्यांमध्ये 40 च्या सरासरीनं आणि 148.96 च्या स्ट्राईक रेटनं 4 हजार 965 धावा केल्या आहेत. त्यानं 2013 साली रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळताना पुणे वॉरियर्सविरुद्ध 66 चेंडूत 175 धावांची नाबाद वादळी खेळी केली होती. या सामन्यात त्यानं 13 चौकार आणि 17 षटकार ठोकले होते.


2) ब्रँडम मॅक्क्युलम- 13 षटकार
तडाखेबाज फलंदाज ब्रँडम मॅक्युलमनं आयपीएलच्या 109 सामन्यांमध्ये 27.69 च्या सरासरीनं 2 हजार 880 धावा केल्या आहेत. 2008 साली रॉयल चॅलेंजर बंगळुरूविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यानं 73 चेंडूत 158 धावा केल्या होत्या. ज्यात 10 चौकार आणि 13 षटकारांचा समावेश होता. 


3) ख्रिस गेल- 13 षटकार
ख्रिस गेलने 2012 साली आरसीबीकडून खेळताना दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध 62 चेंडूत नाबाद 128 धावांची खेळी केली होती. ज्यात त्यानं 7 चौकार आणि 13 षटकार ठोकले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 206.45 होता.


4) ख्रिस गेल- 12 षटकार
ख्रिस गेलनं 2015 साली आरसीबीकडून खेळताना किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध 57 चेंडूत 117 धावांची खेळी खेळली होती.  ज्यात त्यानं 7 चौकार आणि 12 षटकार मारले होते.


5) एबी डिव्हिलियर्स - 12 षटकार
डिव्हिलियर्स, मिस्टर 360 म्हणून प्रसिद्ध, 2016 मध्ये गुजरात लायन्स विरुद्ध आरसीबीकडून खेळताना 52 चेंडूत नाबाद 129 धावांची खेळी केली होती. एबी डिव्हिलियर्सच्या आक्रमक खेळीत 10 चौकार आणि 12 षटकारांचा समावेश होता. 


हे देखील वाचा-