LSG vs GT, IPL 2022: आयपीएल 2022 मधील 57 वा सामन्यात आयपीएलच्या गुणतालिकेतील टॉप 2 चे संघ मंगळवारी आमने-सामने आले. बेस्ट विरुद्ध बेस्टच्या या लढतीत गुजरात टायटन्सनं लखनौ सुपर जायंट्सचा 62 धावांनी पराभव करून आयपीएल 2022 प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. लखनौ सुपर जायंट्सला अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. लखनौच्या संघाचे सध्या 16 गुण असून त्यांना आणखी दोन सामने खेळायचे आहेत. परंतु, गुजरातविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर लखनौचा मेंटर गौतम गंभीर (Gautam Gambhir) खेळाडूंवर चांगलाच भडकला. हरण्यात काही नुकसान नाही, पण पराभव स्वीकारणं अत्यंत चुकीचे आहे, असं गौतम गंभीर लखनौच्या खेळाडूंना बोलताना दिसत आहे.


लखनौ सुपर जायंट्सनं त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये गंभीर सामन्यानंतर खेळाडूंशी बोलताना दिसत आहे. "मला वाटतं आज आपण लढलो नाही. या सामन्यात सर्व खेळाडू अशक्त दिसत होते. हरण्यात काही नुकसान नाही. एका सामन्यात एक संघ जिंकतो, तर दुसऱ्यात पराभव स्वीकारतो. पण पराभव स्वीकारणं अत्यंत चुकीचे आहे. गुजरातकडं जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत.  पण तुम्ही आंतरराष्ट्रीय गोलंदाजांविरुद्ध खेळत आहात आणि संघांनी आम्हाला आव्हान द्यावे अशी आमची इच्छा आहे. आम्हाला आव्हानांचा सामना करायचा आहे आणि म्हणूनच आम्ही सराव करतो, असं गौतम गंभीर म्हणाला आहे.


व्हिडिओ-



गुजरातच्या संघानं दिलेल्या 145 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या संघ 13.5 षटकांत 82 धावांवर आटोपला. लखनौच्या संघाकडून दीपक हुड्डानं सर्वाधिक 27 धावा केल्या. त्यानं 26 चेंडूत तीन चौकार मारले. तर, कर्णधार केएल राहुल 8 धावा करून माघारी परतला. क्विंटन डी कॉकला या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. तोही 11 धावा करून आऊट झाला. त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला संघाचा डाव पुढे घेऊन जाता आला नाही. 


हे देखील वाचा-