LSG vs GT, IPL 2022: आयपीएल 2022 च्या 57 व्या सामन्यात गुजरात टायटन्सनं लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. गुजरातनं हा सामना 62 धावांनी जिंकला आणि आयपीएलच्या या हंगामातील प्लेऑफसाठी पात्र ठरले. या सामन्यात लखनौचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्यानं (Krunal Pandya) पाच चेंडूत पाच धावा केल्या. परंतु, ज्या पद्धतीनं तो आऊट झालाय, हे त्याच्या आयपीएलच्या संपूर्ण कारकिर्दीत पहिल्यांदाच असं घडलंय. 


दरम्यान, कोलकात्याच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या संघाची दमछाक झाली. लखनौच्या डावातील तिसऱ्या षटकात क्विंटन डी कॉक आऊट झाला. त्यानंतर पाचव्या षटकात केएल राहुल, सहाव्या षटकात करण शर्मा आऊट झाले. त्यानंतर क्रुणाल पांड्या फलंदाजी करण्यासाठी आला. त्यालाही या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. तो पाच धावा करून स्टंपिंग आऊट झाला. आयपीएलच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच क्रुणाल पांड्या स्टंपिंग आऊट झाला आहे. 


ट्वीट-



क्रुणाल पांड्याची आयपीएलमधील कामगिरी
क्रुणाल पांड्यानं आयपीएलमध्ये 96 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 137 च्या सरासरीनं 1 हजार 03 धावा केल्या आहेत. गुजरातविरुद्ध कृणाल पांड्या त्याच्या आयपीएलच्या कारकिर्दीतील 83वा डाव खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. आयपीएलमध्ये तो स्टंप आऊट होण्याची पहिलीच वेळ आहे.


गुजरातविरुद्ध सामन्यात लखनौचा 62 धावांनी पराभव
गुजरातच्या संघानं दिलेल्या 145 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या संघ 13.5 षटकांत 82 धावांवर आटोपला. लखनौच्या संघाकडून दीपक हुड्डानं सर्वाधिक 27 धावा केल्या. त्यानं 26 चेंडूत तीन चौकार मारले. तर, कर्णधार केएल राहुल 8 धावा करून माघारी परतला. क्विंटन डी कॉकला या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. तोही 11 धावा करून आऊट झाला. त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला संघाचा डाव पुढे घेऊन जाता आला नाही. 


हे देखील वाचा-