MI vs RR Live Streaming: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील नवव्या सामन्यात मुंबई आणि राजस्थान यांच्यात भिडत होणार आहे. मुंबईच्या संघाचं नेतृत्व भारताचा कर्णधार रोहित शर्मा करीत आहे. तर, राजस्थानच्या कर्णधारपदाची जबाबदारी भारताचा युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक संजू सॅमसन संभाळत आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थानच्या संघानं पहिला सामना जिंकला आहे. तर, मुंबईच्या संघाला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय. आजच्या सामन्यात विजय मिळवून राजस्थानचा संघ विजय घौडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर, मुंबईचा संघ या हंगामातील पहिल्या विजयाच्या शोधात मैदानात उतरणार आहे.
मुंबई आणि राजस्थान यांच्यातील सामना आज शनिवारी (2 एप्रिल) रोजी खेळवला जाईल. मुंबई आणि राजस्थान यांच्यातील हा सामना मुंबईच्या डॉ. डी. वाय.पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मुंबई आणि राजस्थान यांच्यातील सामन्यासाठी दुपारी 3 वाजता नाणेफेक होणार आहे. तर, 3.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. मुंबई आणि राजस्थान यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल. लाइव्ह स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शनसह Disney+Hotstar वर सामना ऑनलाइन पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/news/sports/amp वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स पाहता येतील.
सुर्यकुमार यादवचं मुंबईच्या संघात पुनारागमन होणार?
मुंबई इंडियन्सचा महत्वाचा खेळाडू सुर्यकुमार यादवची संघात एन्ट्री झाली आहे. दुखापतीमुळं त्याला दिल्लीविरुद्ध सामन्यातून मुकावं लागलं होतं. दुखापतीतून पूर्णपणे बरे झाल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाच्या बायो-बबलमध्ये पोहोचण्यासाठी त्यानं बुधवारी त्याचा क्वारंटाईनचा कालावधी संपवलाय. त्यानंतर त्यानं संघातील इतर खेळाडूंसोबत जिम सेशनमध्येही भाग घेतला. राजस्थानविरुद्ध आज खेळण्यात येणाऱ्या सामन्यात सुर्यकुमार यादवला संघात पुनारागमन होण्याची शक्यता आहे.
मुंबईचा संघ-
रोहित शर्मा , जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, ईशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, बसिल थम्पी, मुरुगन आश्विन, जयदेव उनाडकट, मयांक मार्कंडे, तिलक वर्मा, संजय यादव, जोफ्रा आर्चर, डॅनियल सॅम्स , टिमल मिल्स, टीम डेव्हिड, रिले मरेडिथ, मोहम्मद अर्शद खान.
राजस्थान संघ-
संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, रवीचंद्रन आश्विन, ट्रेण्ट बोल्ट, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, प्रसिध कृष्णा, युजवेंद्र चहल, पराग रियान, केसी करिअप्पा, नवदीप सैनी, महिपाल लोमरोर , ओबेद मेकॉय, चामा मिलिंद, अनुनयसिंह.
हे देखील वाचा-
- IPL 2022 Points Table : कोलकाता पहिल्या क्रमांकावर, चेन्नई-मुंबई तळाशी, पर्पल-ऑरेंज कॅपही कोलकात्याकडे
- IPL 2022, KKR vs PBKS Match Highlights : उमेशचा भेदक मारा, रसेलची वादळी खेळी, कोलकात्याचा पंजाबवर सहा गडी राखून विजय
- IPL 2022, KKR vs PBKS : उमेश यादवचा भेदक मारा, पंजाबची 137 धावांपर्यंत मजल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha