MI vs RR, 1 Innings Highlight: नवी मुंबईच्या (Navi Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील नवव्या सामन्यात राजस्थानच्या संघानं मुंबईसमोर 194 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघानं राजस्थानच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केलं. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थानच्या संघानं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी केली. सलामीवीर जॉस बटलरच्या झुंजार शतकाच्या जोरावर राजस्थाननं 20 षटकात चार विकेट्स गमावून 193 धावा केल्या आहेत.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात राजस्थानच्या संघाची सुरुवात खराब झाली. जॉस बटलरसोबत संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आलेल्या यशस्वी जयस्वाल स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर जॉस बटलर आणि देवदत्त पडीकलनं (7 धावा) संघाचा डाव सावरला. परंतु, सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पडीकलनं विकेट गमावली. दरम्यान, कर्णधार संजू सॅमसनही आक्रमक खेळी केली. परंतु, त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पोलार्डच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. मात्र, एकाबाजूनं जॉस बटलरनं आपली आक्रमक खेळी सुरूच ठेवली. 15 षटकानंतर हेटमायरनंही मुंबईच्या गोलंदाजी शाळा घेतली. 14 चेंडूत त्यानं 35 धावांची तडाखेबाज फलंदाजी केली. 19 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याला बुमराहनं माघारी धाडलं. त्यानंतर लगेच जसप्रीत बुमराहनं जॉस बटलरच्या आक्रमक खेळीला पूर्णविराम लावलं. त्यानंतर रियान पराग (4 चेंडू 5 धावा), आर. अश्विन 1 धाव, नवदीप सैनी 2 तर, ट्रेन्ट बोल्टनं नाबाद एक धाव केली. ज्यामुळं राजस्थानच्या संघानं मुंबईसमोर 194 धावांचं लक्ष्य ठेवलं. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि टी. मिल्सनं प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतले. तर, पोलार्डनं एक विकेट्स मिळवली.
संघ-
राजस्थानचा संघ: जोस बटलर, यशस्वी जायसवाल, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरोन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा.
मुंबईचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), अनमोलप्रीत सिंह, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, टिम डेविड, डेनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टाइमल मिल्स, बसील थम्पी.
हे देखील वाचा-
- GT vs DC, IPL 2022 : हार्दिक की पंत, कोण मारणार बाजी? पुण्याच्या मैदानावर होणार लढत
- ICC World Cup 2011: आजच्या दिवशी अकरा वर्षापूर्वी भारतानं दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला!
- MI vs RR: आज रोहित शर्मा आणि संजू सॅमसन आमने- सामने; मुंबई- राजस्थान यांच्यातील सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha