On This Day In 2011: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. आजच्या दिवशी अकरा वर्षापूर्वी भारतानं दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरलं होतं. एकदिवसीय विश्वचषक 2011 च्या अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेला धुळ चाखली होती. याआधी भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतानं 2018 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाचा खिताब जिंकला होता. त्यानंतर 28 वर्षानंतर भारतानं दुसरा विश्वचषक जिंकला. हा अविस्मरणीय सामना कसा होता? यावर एक नजर टाकुयात.


एकदिवसीय विश्वचषक 2011 च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. परंतु, महेला जयवर्धनेनं धडाकेबाज शतक आणि कर्णधार संगकार (48) आणि तिलकरत्ने दिलशान (33) यांनी श्रीलंकेला चांगली धावसंख्या गाठण्यास मदत केली. अखेरच्या षटकात फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या नुवान कुलसेकरा आणि थिसरा परेरा यांनी तडाखेबाजी फलंदाजी करत श्रीलंकेची धावसंख्या 274 वर पोहचवली. 


भारतीय फलंदाजी क्रम पाहता 275 धावांचं लक्ष्य फारसं मोठं वाटत नव्हतं. परंतु, सलामी देण्यासाठी मैदानात आलेल्या भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवान शून्यावर बाद झाल्यानंतर संघ थोडा अडचणीत सापडला. त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या रुपात भारताला 31 धावांवर दुसरा झटका बसला. सचिन बाद होताच मैदानात शांतता पसरली.  त्यावेळी भारताचं पुन्हा विश्वचषक जिंकण्याचा स्वप्न धुसर होतं की काय? असं वाटू लागलं होतं. मात्र, गौतम गंभीरनं (97 धावा) आणि विराट कोहलीनं (35 धावा) संयमी खेळ दाखवत संघाच्या आशा वाढवल्या. त्यानंतर धोनीच्या 91 धावांच्या झंझावाती खेळीनं भारताला विश्वचषक जिंकून दिला. 


भारताने 1983 मध्ये पहिला विश्वचषक जिंकला होता. भारताला दुसरा विश्वचषक जिंकण्याठी तब्बल 28 वर्ष वाट पाहावी लागली. या विजयाच्या आनंदात एकीकडे भारतीय खेळाडू मैदानात जल्लोष करत होते. तर, भारतीयांनी चौकाचौकात ढोल-ताशे आणि फटाके फोडून भारताचा विजय साजरा केला. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha