GT vs DC, IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगमातील दहावा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये होणार आहे. पुण्यातील एमसीएच्या मैदानावर हे दोन्ही संघ एकमेंकासमोर भिडणार आहेत. सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. आयपीएलमध्ये गुजरात आणि दिल्ली पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. गुजरातकडून हार्दिक पांड्या तर दिल्लीच्या कर्णधारपदाची सुत्रे ऋषभ पंतच्या खांद्यावर आहेत.
गुजरातने पहिल्या सामन्यात लखनौचा पाच विकेटनं पराभव करत आयपीएलची सुरुवात दणक्यात केली होती. दुसरीकडे दिल्लीनेही पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव करत विजयाचा श्रीगणेशा केला. गुजरात आणि दिल्लीचा संघ विजयाची लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल. दोन्ही संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.
पिच रिपोर्ट -
पुण्यातील एमसीए क्रिकेटचं मैदान सुरुवातीला फलंदाजीसाठी पोषक आहे. त्यानंतर येथे फिरकी गोलंदाजांचा दबदबा राहतो. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा मदत मिळतो. दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ 80 टक्के जिंकला आहे.
दिल्लीची ताकद अन् कमजोरी काय?
दिल्लीची सर्वात मोठी ताकद सलामी जोडी होऊ शकते. पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर हे विस्फोटक फलंदाज कोणत्याही गोलंदाजाची धुलाई करण्यास सक्षम आहेत. त्याशिवाय ऋषभ पंतचा फॉर्म दिल्लीसाठी जमेजी बाजू आहे. गोलंदाजीबाबत बोलायचं झाल्यास, दिल्लीकडे एकापेक्षा एक दर्जेदार गोलंदाज आहेत. एनरिक नॉर्खिया, चेतन साकरिया, मुस्तफिजुर रहमान, लुंगी एनगिडी, शार्दूल ठाकुर आणि खलील अहमद यासारखे धुरंधर गोलंदाज दिल्लीकडे आहेत. मार्श आणि डेव्हिड वॉर्नर सुरुवातीच्या काही सामन्यांना उपलब्ध नाहीत. त्याशिवाय वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया दुखापतीतून सावरलेला नाही. आयपीएलमध्ये तो खेळणार की नाही? यावर सस्पेन्स आहे.
गुजरातची ताकद, कमकुवत बाजू?
गुजरात टायटन्स संघाचा विचार करता त्यांच्याकडे असणारा बोलिगं अटॅक त्यांची सर्वात जमेची बाजू आहे. कारण संघात जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू राशिद खान आहे. सोबत वेगवान गोलंदाजीसाठी लॉकी फर्ग्यूसन आणि मोहम्मद शमी सारखे दिग्गज आहेत. नवखा पण उत्तम असा अल्झारी जोसेफही गुजरातमध्ये असून अनुभवी जयंत यादव आणि आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असणारा राहुल तेवतिया संघात आहे. संघात सलामीवीरांचा प्रश्न काहीसा कठीण आहे. कारण नुकताच जेसन रॉय याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे एकट्या शुभमनवर सलामीची जबाबदारी आहे.
असा आहे गुजरातचा संघ -
शिलेदार – हार्दिक पंड्या (15 कोटी), राशिद खान (15 कोटी) शुभमन गिल (8 कोटी), मोहम्मद शमी (6.25 कोटी), जेसन रॉय (2 कोटी), लॉकी फर्ग्युसन (10 कोटी), अभिनव सदरंगानी (2.6 कोटी), राहुल तेवातिया (9 कोटी), नूर अहमद (30 लाख), साई किशोर (3 कोटी), डॉमनिक ड्रेक्स (1.10 कोटी), जयंत यादव (1.70 कोटी), विजय शंकर (1.40 कोटी), दर्शन नालकंडे (20 लाख), यश दयाल (3.20 कोटी), अल्झारी जोसेफ (2.40 कोटी), प्रदीप सांगवान (20 लाख), मॅथ्यू वेड (2.40 कोटी), वृद्धिमान साहा – (1.90 कोटी), डेविड मिलर – ( 3 कोटी), वरुण अरॉन- 50 (लाख रुपये), गुरकीरत मान सिंह- (50 लाख रुपये), नूर अहमद – (30 लाख रुपये), साईं सुदर्शन- 20 लाख रुपये
दिल्ली कॅपिटल्सचा संघ -
फलंदाज - पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, मनदीप सिंह, यश धुल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, अश्विन हॅब्बार
गोलंदाज - चेतन साकरिया, एनरिक नॉर्खिया, खलील अहमद, कमलेश नागरकोटी, लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रहमान, शार्दूल ठाकुर
अष्टपैलू - अक्षर यादव, ललित यादव, रिपल पटेल, विक्की ओत्सवाल, मिचेल मार्श
विकेटकीपर- ऋषभ पंत (कर्णधार), केएस भरत, टिम सिफर्ट
फिरकीपटू - कुलदीप यादव, प्रवीण दुबे