IPL Mumbai Indians Top Players : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मधील सोळावा सामना मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात रंगणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना पार पडणार आहे. दरम्यान, आज या दोन्ही संघांनी खातं उघडण्याची संधी आहे. दिल्लीने आतापर्यंत तीन सामने खेळले असून त्यांनी एकही सामना जिंकलेला नाही. तस दुसरीकडे मुंबई संघाचाही यंदाच्या मोसमातील दोन सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. दरम्यान आजच्या सामन्यात मुंबई दोन्ही संघ विजयासाठी उतरणार आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स संघातील तिलक वर्मा, नेहाल वढेरा, कॅमेरॉन ग्रीनसह टॉप 5 खेळाडूंकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


MI Top 5 Players : मुंबई संघातील टॉप 5 खेळाडू


Tilak Verma : तिलक वर्मा


आयपीएल 2022 मध्ये तिलक वर्माच्या दमदार फलंदाजीने सर्वांनाच प्रभावीत केलं. तो 15 व्या हंगामत MIसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. तिलक वर्माने मागील हंगामात दमदार कामगिरी केली. 2022 तिलक वर्माचं आयपीएलचा पहिला सीझन होता. त्याने 14 सामन्यांमध्ये 131.02 च्या स्ट्राइक रेटने 397 धावा केल्या. आयपीएलच्या यंदाच्या 16व्या हंगामात मुंबईच्या संघातील रोहित शर्मासह तिलक वर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस आणि टीम डेव्हिड सारख्या खेळाडूंसह त्याची कामगिरी पाहण्यासारखी असेल.


Cameron Green : कॅमेरॉन ग्रीन


ऑस्ट्रेलियन अष्टपैलू क्रिकेटपटू कॅमेरॉन ग्रीनचा हा पहिला आयपीएल हंगाम आहे, तो याआधी आयपीएल खेळलेला नाही. IPL 2023 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने कॅमेरॉन ग्रीनला 17.50 कोटी रुपयांना विकत घेतले. यंदाच्या सीझनमध्ये सॅम करननंतर कॅमेरॉन दुसरा महागडा खेळाडू आहे. पंजाब किंग्जने सॅम कुरनला तब्बल 18.50 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. तर मुंबईने कॅमेरॉनला 17.50 कोटी रुपयांना विकत घेतलं.


Nehal Wadhera : नेहाल वढेरा


पदार्पणाच्या सामन्यातच मुंबईच्या 22 वर्षीय नेहाल वढेरा याने सर्वांची मने जिंकली. नेहालने पदार्पणाच्या सामन्यात 13 चेंडूत 21 धावांची प्रभावी खेळी केली. या खेळीदरम्यान नेहालची चर्चा सुरु झाली. नेहाल वढेरा याने आरसीबीविरोधात 101 मीटरचा गगनचुंबी षटकार लगावला. कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर नेहाल वढेरा याने लागोपाठ दोन षटकार लगावले. त्यामधील एक चेंडू स्टेडिअमवर बाहेर गेला.


Ishan Kishan : ईशान किशन


ईशान किशननं मागील सामन्यात 32 धावांची छोटी पण चांगली खेळी केली. ईशान किशन 24 वर्षांचा असून त्याने भारतीकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. ईशान विकेटकिपर आणि फलंदाज म्हणून खेळतो. त्याने मार्च 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ईशान देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंड संघाकडून खेळतो.


Tim David : टिम डेव्हिड


टिम डेव्हिड यंदा मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. 2021 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) साठी खेळताना त्याने आयपीएल (IPL 2021) मध्ये पदार्पण केलं. मूळचा सिंगापूरचा असलेला 27 वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. टीम डेव्हिडने डेथ ओव्हर्समध्ये चांगली फलंदाजी केली आहे. डेव्हिडच्या आयपीएल कारकिर्दीत, टीमने नऊ सामने खेळले असून 31.17 च्या सरासरीने 187 धावा केल्या आहेत. आयपीएलमधील त्याने सर्वाधिक 46 धावा केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राइक रेट 210.11 आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Rinku Singh : सिलेंडर डिलिव्हरी करणारा बाप, 5 भावंडं, जितकी थरारक खेळी, तितकीच थरारक रिंकू सिंहची कहाणी!