RCB Captain Fined 12 Lakh : आयपीएल 2023 (IPL 2023) मधील पंधराव्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्समधून (Lucknow Super Giants) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) पराभव केला. रोमांचक सामन्यात शेवटच्या चेंडूवर लखनौकडून बंगळुरुचा पराभव झाला. या सामन्यातील पराभवानंतर आरसीबीला आणखी एक झटका बसला आहे. सोमवारचा दिवस (10 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी वाईट ठरला. आरसीबीने लखनौ विरुद्धचा जवळजवळ जिंकलेला सामना गमावला.
लखनौकडून पराभवानंतर आरसीबीला आणखी एक झटका!
बंगळुरु संघाला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर आरसीबीसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या आयोजकांनी संघाचा कर्णधार फाफ डु प्लेसिसला (Faf du Plessis) मोठा दंड ठोठावला आहे. अशाप्रकारे आरसीबीला दोनदा फटका बसला आहे.
कर्णधार डु प्लेसिसला 12 लाखांचा दंड
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या 15 व्या सामन्यात सोमवारी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M Chinnaswamy Stadium) लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध (LSG) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यानंतर आरसीबी संघाला आयपीएल आयोजकांनी 12 लाखांचा दंड ठोठावला आहे. स्लो ओव्हर रेटसाठी आरसीबी दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामात पहिल्यांदाच एखादा संघ स्लो ओव्हर रेटसाठी आयोजकांनी संघाचा कर्णधार फाफ डु प्लेसिसला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
स्लो ओव्हर रेटसाठी ठोठावला दंड
सोमवारी रात्री झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू लखनौ (LSG) फलंदाजांनी आरसीबीच्या (RCB) गोलंदाजांना धुतलं. लखनौ संघ विजयाकडे कूच करत असताना आरसीबीचा कर्णधार डु प्लेसिस सतत फील्ड, गोलंदाज आणि डावपेच बदलत होता. या दरम्यान त्यांचा बराच वेळ वाया गेला. यामुळे परिणामी आरसीबीला आयपीएलने नेमून दिलेल्या वेळेत षटकं टाकता आली नाहीत आणि त्यांनी स्लो ओव्हर टाकत अधिक वेळ घेतला. यामुळेच सामन्यानंतर आयपीएल समितीने आरसीबीचा कर्णधार टु प्लेसिसला दंड ठोठावला आहे.
शेवटच्या चेंडूवर लखनौचा आरसीबीवर विजय
लखनौ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध एक गडी राखून विजय मिळवला. लखनौचा हा ऐतिहासिक विजय होता. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 212 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौने शेवटच्या चेंडूवर 1 गडी राखून सामना जिंकला. लखनौकडून निकोलस पूरनने 62 धावा केल्या. त्यानं 19 चेंडूत 7 षटकार आणि 4 चौकार मारले. स्टॉइनिसने 65 धावा ठोकल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :