IPL 2023, DC vs MI : दिल्ली आमि मुंबईचा संघ पहिल्या विजयासाठी मंगळवारी मैदानावर उतरणार आहेत. आयपीएलच्या 16 व्या हंगामात दिल्लीला सलग तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय तर मुंबईला दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी मैदानावर उतरणार आहेत. गुणतालिकेतील तळाशी असणाऱ्या दोन संघातील लढत तुल्याबळ होण्याची शक्यता आहे. दिल्ली आणि मुंबई यांच्यात आयपीएलमध्ये काटें की टक्कर पाहायला मिळाली आहे. मुंबई आणि दिल्ली यांच्यामध्ये हेड टू हेड काय स्थिती आहे... दिल्लीतील स्टेडिअमची खेळपट्टी कशी असेल? संभावित प्लेईंग 11 कशी असेल.. याबाबत जाणून घेऊयात.. 


हेड टू हेड –


दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये आयपीएलमध्ये आतापर्यंत 32 सामने झाले आहेत. यामध्ये 17 सामन्यात मुंबईने बाजी मारली आहे तर 15 सामने दिल्लीने जिंकले आहेत. दोन्ही संघातील मागील पाच सामन्यात दिल्लीचा संघ वरचढ असल्याचे पाहायला मिळालेय. मागील पाच सामन्यात दिल्लीच्या संघाने तीन विजय मिळवले आहेत. तर मुंबईला फक्त दोन सामन्यात बाजी मारता आली. 


पिच रिपोर्ट –


दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजासाठी पोषक आहे. चेंडू बॅटवर सहज येतो, त्यामुळे या मैदानावर धावाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मैदान छोटे असल्यामुळे चौकार आणि षटकारांचा पाऊस पडू शकतो. या मैदानाचे आऊटफील्डही चांगली आहे. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. कारण या मैदानावर धावांचा पाठलाग यशस्वीपणे झालाय. 78 सामन्यापैकी 42 सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने बाजी मारली आहे. या मैदानावरील सरासरी धावसंख्या 171 इतकी आहे. तर 231 धावसंख्या सर्वोच्च आहे. 


IPL 2023, DC vs MI : कधी आणि कुठे होणार सामना?
दिल्ली कॅपिटल्स (RCB) आणि मुंबई इंडियन्स (LSG) यांच्यात 11 एप्रिल रोजी लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडिअमवर  (Arun Jaitley Stadium, New Delhi) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणफेक होईल.


DC vs MI, IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे प्रत्येक अपडेट्स उपलब्ध असतील.


दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सची संभावित प्लेईंग 11 कशी असेल - 


दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, डेविड वार्नर (कर्णधार), रिले रुसो, मनीष पांडे, रोवमन पॉवेल अक्षर पटेल,  अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, खलील अहमद, एनरिक नॉर्खिया आणि मुकेश कुमार 


मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, कॅमरून ग्रीन, तिलक वर्मा, टिम डेविड, नेहल वढेरा, ऋतिक शौकीन, पीयूष चावला, जोफ्रा आर्चर आणि अरशद खान 


दोन्ही संघाचे पूर्ण स्क्वाड –


दिल्ली कॅपिटल्स: अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एनरिख नॉर्खिया, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, सरफराज खान, कमलेश नागरकोटी, मुस्तफिजुर रहमान, कुलदीप यादव, खलील अहमद, चेतन सकारिया, ललित यादव, रिपल पटेल, यश ढुल, रोवमैन पॉवेल, प्रवीण दुबे , लुंगी एनगिडी, विक्की ओस्तवाल, अमन खान, फिल साल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिले रुसो


मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, संदीप वॉरियर, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, जोफ्रा आर्चर, टिम डेविड, मोहम्मद अरशद खान, रमनदीप सिंह, ऋतिक शौकीन, अर्जुन तेंदुलकर, ट्रिस्टन स्टब्स, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, कॅमरून ग्रीन, रिले मेरेडिथ, पीयूष चावला, डुआन जानसन, विष्णु विनोद, शम्स मुलानी, नेहल वढेरा, राघव गोयल