DC vs MI Preview, IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स आयपीएलच्या 16 व्या हंगामातील पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहेत. दिल्लीचा तीन आणि मुंबई इंडियन्सचा दोन सामन्यात पराभव झालाय. हे दोन्ही संघ विजयाचे खाते उघडण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. गुणतालिकेत दिल्ली आणि मुंबई संघ तळाशी आहेत, दोन्ही संघाला आतापर्यंत लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. रोहित शर्मा आणि डेविड वॉर्नर यांना अंतिम 11 खेळाडू अद्याप मिळालेले नाही. प्रत्येक सामन्यात बदल पाहायला मिळतात. दिल्लीच्या संघाला ऋषभ पंतची कमी जाणवत आहे, तर मुंबईचा संघ जसप्रीत बुमराहाशिवाय कमकुवत वाटत आहे. 


दिल्ली कुठे ठरतेय कमकुवत -


2022 च्या अखेरीस ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला होता, यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे तो आयपीएलच्या संपूर्ण हंगामाला मुकलाय. पंतच्या अनुपस्थितीत दिल्लीचा मध्यक्रम कमकुवत जाणवतोय. त्याशिवाय विकेटकिपर म्हणून पहिल्या सामन्यात सरफराज खानला उतरवले होते तर दोन सामन्यात पोरेल याला स्थान दिले होते. पण पोरेल याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव कमी आहे. सरफराज देशांतर्गत क्रिकेटमध्ये विकेटकीपिंग करत नाही. दिल्लीला तिन्ही सामन्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला. लखनौ, गुजरात आणि राजस्थान या संघांनी दिल्लीचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. 


डेविड वॉर्नर फलंदाजीत धावा काढतोय, पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळत नाही. वॉर्नर याचा स्ट्राइक रेटही कमीच आहे. वॉर्नर याने तीन सामन्यात 158 धावा चोपल्या आहेत, यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट फक्त 117 इतकाच राहिलाय. पृथ्वी शॉ दोन्ही तिन्ही सामन्यात फ्लॉप गेलाय. त्याला फक्त 19 धावा काढता आल्यात. सरफराज, मिशेल मार्श, रोवमन पॉवेल, रायली रुसो, ललित यादव, मनिष पांडे आणि हकीम खान यासारखे फलंदाज अपयशी ठरत आहेत. दिल्लीला विजय मिळवायचा असेल तर फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. दिल्लीच्या गोलंदाजीतही धार दिसत नाही. खलील अहमद, मुकेश कुमार, चेतन सकारिया, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांना अद्याप लय मिळालेली नाही. एनरिक नॉर्खिया यालाही दोन सामन्यात चांगली कामगिरी करता आलेली नाही.


मुंबईची अवस्था कशी - 
 
दिल्लीप्रमाणे मुंबईची फलंदाजी आणि गोलंदाजी कमकुवत आहे. रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, कॅमरुन ग्रीन, टिम डेविड यांना मोठी खेळी करता आली नाही. तिलक वर्मा याने पहिल्या सामन्यात नाबाद 84 धावांची खेळी केली होती. त्याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आलेली नाही. गोलंदाजीतही मुंबई कमकुवत दिसत आहे. बुमराहची कमी खालावल्याचे दोन्ही सामन्यात दिसले. जोफ्रा आर्चर लयीत नाही. जेसन बेहरेनडोर्फ, ग्रीन, आर्चर आणि अरशद खान अद्याप छाप पाडू शकले नाहीत.  पीयूष चावला, ऋतिक शौकीन आणि कुमार कार्तिकेय यांनाही विकेट घेण्यात अपयश येतेय. टी 20 मधील आघाडीचा फलंदाज सूर्यकुमार यादव आणि कॅमरुन ग्रीन हे विस्फोटक फलंदाज असतानाही मुंबईला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. 


दिल्ली कॅपिटल्स : 


डेविड वार्नर(कर्णधार), पृथ्वी शॉ, मिशेल मार्श, सरफराज खान, अमन हाकिम खान, अभिषेक पोरेल,अक्षर पटेल, खलील अहमद, कुलदीप यादव, रोवमन पॉवेल, रिली रोसेयु, एनरिक नोर्किया,मुस्ताफिजुर रहमान, चेतन सकारिया, मुकेश कुमार, फिल सॉल्ट, लुंगी एनगिडी, प्रवीणदुबे, ललित यादव, रिपल पटेल, विक्की ओस्तवाल, इशांत शर्मा, मनीष पांडे, कमलेशनागरकोटी आणि यश धुल


मुंबई इंडियन्स :


रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, टिमडेविड, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, विष्णु विनोद, कॅमरून ग्रीन, अर्जुन तेंदुलकर, रमनदीप सिंह, शम्स मुलानी, रिले मेरेडिथ, नेहालवढेरा, ऋतिक शोकीन, अर्शद खान, डुआन जेनसन, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, राघवगोयल, जोफ्रा आर्चर, जेसन बेहरेनडोर्फ आणि आकाश मढवाल