Harshal Patel 100 Wickets in IPL : इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) सध्या सोळावा हंगाम सुरु आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये नवनवीन विक्रम रचने आणि मोडले जात आहेत. आता लखनौ (LSG) विरुद्धच्या सामन्या आरसीबीचा (RCB) गोलंदाज हर्षल पटेल (Harshal Patel) यानं 'विराट' कामगिरी केली आहे. लखनौ सुपर जायंट्सने शेवटच्या षटकात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा एका विकेटने पराभव केला. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 212 धावा केल्या, पण लखनौ संघाच्या धडाकेबाज खेळाडू निकोलस पूरन आणि मार्कस स्टॉइनिस यांच्यामुळे लखनौने सामना जिंकला. दरम्यान, आरसीबीने सामना गमावल्यानंतरही आरसीबीचा गोलंदाज हर्षल पटेलने एक मोठा विक्रम केला.


आयपीएलमध्ये हर्षल पटेलची '100 नंबरी' कामगिरी


लखनौ विरोधातील सामान हरल्यानंतरही आरसीबीचा गोलंदाज हर्षल पटलनं इतिहास रचला आहे. त्याने या सामन्यात फक्त 2 विकेट घेतल्या. पण आयपीएमध्ये 100 विकेट्स घेण्याची मोठी कामगिरी केली आहे. आरसीबी संघाचा एका विकेटने पराभव केला. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 212 धावा केल्या, पण लखनौ संघाने निकोलस पूरन आणि मार्कस स्टॉइनिस यांच्यामुळे लक्ष्य गाठलं. सामना गमावल्यानंतरही आरसीबीचा गोलंदाज हर्षल पटेलने मोठा विक्रम केला.


दोन विकेट घेत आयपीएलमध्ये रचला 'विराट' विक्रम


लखनौविरुद्धच्या सामन्यापूर्वी हर्षल पटेलच्या नावावर आयपीएलच्या 99 विकेट होत्या, पण या सामन्यात दोन विकेट घेताच त्याने आयपीएलमधील 100 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. अखेरच्या षटकात लखनौच्या संघाला विजयासाठी 4 धावांची गरज होती, तेव्हा आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने चेंडू हर्षल पटेलकडे सोपवला. या षटकात त्याने शानदार गोलंदाजी केली. त्याने पहिल्याच चेंडूवर एकेरी धाव दिली. त्यानंतर मार्क वुड दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. यानंतर त्यानंतर जयदेव उनाडकटलाही पाचव्या चेंडूवर डु प्लेसिसकडून झेलबाद केलं. हर्षलने सामन्याच्या 4 षटकात 48 धावा देत 2 बळी घेतले. अशा प्रकारे त्याने आयपीएलमध्ये 100 विकेट्स पूर्ण केल्या.




हर्षल पटेलचा आतापर्यंतचा प्रवास


हर्षल पटेल 2012 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलच्या 81 सामन्यांत 101 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये त्याने 27 धावा देत 5 बळी ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. याशिवाय तो डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो.


रोमांचक सामन्यात लखनौचा शेवटच्या चेंडूवर विजय


आयपीएलमध्ये लखनौने आरसीबीचा एका विकेटने पराभव केला. एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात लखनौने बाजी मारली. अखेरच्या षटकात लखनौला विजयासाठी पाच धावांची गरज होती. पण मात्र मार्क वूड आणि जयदेव बाद झाल्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली. अखेरच्या चेंडूवर एका धावेची गरज असताना बिश्नोई आणि आवेश यांनी लखनौला विजय मिळवून दिला. लखनौने 2013 धावांचा पाठलाग करताना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. लखनौकडून 12 षटकार आणि 17 चौकार लगावण्यात आले. निकोलस पूरन याने 19 चेंडूत 62 तर स्टॉयनिस याने 30 चेंडूत 65 धावांची खेळी केली. आरसीबीकडून मोहम्मद सिराज आणि वेन पार्नेल यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. हर्षल पटेल याला दोन विकेट मिळाल्या. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 Points Table : RCB विरुद्धच्या विजयानंतर लखनौची पहिल्या नंबरवर मजल, 'हे' चार संघ प्ले ऑफमध्ये पोहोचणार; गुणतालिकेतील बदल पाहा