Mahela Jayawardene Mumbai Indians Head Coach : इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू महेला जयवर्धने यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. आयपीएल 2025च्या लिलावापूर्वी संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये मोठे बदल केले आहेत. महेला जयवर्धने यांनी यापूर्वी 2017 ते 2022 या कालावधीत मुंबईचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. मुंबई इंडियन्सने 13 ऑक्टोबर रोजी महेला जयवर्धनेची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली.






महेला जयवर्धनेचा विक्रम


मार्क बाउचर 2023 आणि 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक होते. पण आता त्याची जागा जयवर्धनेने घेतली आहे. प्रशिक्षक म्हणून जयवर्धनेचा चांगला रेकॉर्ड आहे. जयवर्धनेच्या प्रशिक्षणात मुंबई इंडियन्सने तीन जेतेपदे जिंकली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले. मुंबईने आतापर्यंत पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे.






मार्क बाऊचरची जागा घेणार महेला जयवर्धने 


मुंबईने 2023 पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू मार्क बाउचरला संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवले होते. परंतु त्यांच्या कार्यकाळात संघाची कामगिरी अत्यंत खराब होती. विशेषत: गेल्या हंगामात म्हणजे आयपीएल 2024. याची सुरुवात कर्णधारपदापासून झाली. संघाने रोहित शर्माला पदावरून हटवले. रोहित हा मुंबईचा यशस्वी कर्णधार आहे. मात्र कोणतीही माहिती न देता त्यांना पदावरून हटवण्यात आले. रोहितच्या जागी हार्दिक पांड्याकडे कमान सोपवण्यात आली होती. त्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या कामगिरीवरही दिसून आला. रोहित-पंड्याचे चाहते सोशल मीडियावर भिडले. त्या वर संघाची मैदानावर सतत खराब कामगिरी. याचा परिणाम असा झाला की संघ गुणतालिकेत तळाशी राहिला आणि हंगामातून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला.


आयपीएल 2025 साठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. हा मेगा लिलाव नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. यासाठी बीसीसीआयने कायम ठेवण्याचे नियम जारी केले असून लवकरच लिलावासाठी जागा जाहीर केली जाणार आहे.


हे ही वाचा -


Pak vs Eng : इंग्लंडविरुद्ध पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघात भूकंप; बाबरसह 4 दिग्गज खेळाडू बाहेर, PCBची घोषणा


Ind vs Ban : टी-20 मालिका संपली अन् 'या' खेळाडूची कारकीर्दही, शेवटच्या सामन्यात किती केल्या धावा?