India vs Bangladesh T20 Series : भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप केला. भारतीय फलंदाजांनी 297 धावांची डोंगराएवढी धावसंख्या उभारली. संजू सॅमसनने झंझावाती शतक झळकावले, तर कर्णधार सूर्यकुमार यादवनेही मागे न राहता दमदार अर्धशतक झळकावले. हार्दिक पांड्याने अवघ्या 18 चेंडूत 47 धावा केल्या. बांगलादेशच्या महमुदुल्लाहची टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर संपुष्टात आली आहे, कारण तिसऱ्या सामन्यापूर्वीच त्याने निवृत्ती जाहीर केली होती.


बांगलादेशचा स्टार खेळाडू महमुदुल्ला याने मालिकेतील शेवटच्या सामन्यानंतर टी-20 मधून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले होते. या फॉरमॅटला अलविदा करण्याची आणि एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे तो म्हणाला. पुढील वर्ल्ड कप पाहता हीच त्याच्यासाठी आणि संघासाठीही योग्य वेळ आहे.


महमुदुल्ला वनडे फॉरमॅटमध्ये खेळणार 


महमुदुल्लाहने 2021 सालापासूनच कसोटीतून निवृत्ती घेतली होती. आता त्याने टी-20 फॉरमॅटलाही अलविदा केला आहे. पण तो एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळत राहील आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये बांगलादेशसाठी चांगल्या कामगिरीकडे लक्ष देईल. 2007 मध्ये त्याने बांगलादेशकडून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर, त्याने 141 टी-20 सामने खेळले आणि 117.74 च्या स्ट्राइक-रेटने 2444 धावा केल्या. याशिवाय या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 43 विकेट्स आहेत.


टी-20 मध्ये तिसरी सर्वात मोठी कारकीर्द


महमुदुल्लाहची टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द 17 वर्षे 41 दिवस चालली. एकूणच त्याची T20I क्रिकेटमधील तिसरी सर्वात मोठी कारकीर्द होती. त्याच्या पुढे बांगलादेशचा शॉन विल्यम्स आणि शाकिब अल हसन आहेत. सर्वाधिक टी-20 सामने खेळण्याच्या बाबतीत तो संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने एकूण 141 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याच्या पुढे पॉल स्टर्लिंग (147 T20I सामने) आणि रोहित शर्मा (159 T20I सामने) आहेत.


गेल्या सामन्यात फ्लॉप


महमुदुल्लाला त्याच्या कारकिर्दीतील शेवटच्या टी-20 सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. चेंडू आणि बॅटने तो फ्लॉप ठरला. भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने 2 षटकात 26 धावा देत 1 बळी घेतला. यानंतर फलंदाजी करताना त्याच्या बॅटमधून फक्त 8 धावा आल्या.


हे ही वाचा -


Babar Azam : आधी कर्णधारपद गेले, आता संघातून होणार हकालपट्टी? इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतून बाबर आझम बाहेर?


Women's T20 World Cup : गणित आता धावांचे... टीम इंडियाला उपांत्य फेरीत जाण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध करावी लागणार हे काम? जाणून घ्या समीकरण


Tilak Varma : तिलक वर्मा असणार टीम इंडियाचा कर्णधार; 'या' 15 खेळाडूंना मिळाली संघात संधी