LSG Vs PBKS LIVE Score Updates, IPL 2024 : लखनौ सुपर जाएंटसने मारली बाजी; पंजाब किंग्सचा केला पराभव

Lucknow Super Giants Vs Punjab Kings LIVE Score Updates, IPL 2024 : आयपीएलमधील अकरावी मॅच लखनौ सुपर जाएंटस आणि पंजाब किंग्ज यांच्यात झाला.

युवराज जाधव Last Updated: 30 Mar 2024 11:24 PM
पंजाबचा 21 धावांनी पराभव

लखनौने घरच्या मैदानावर पंजाबचा 21 धावांनी पराभव केला. पंजाब संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून केवळ 178 धावा केल्या.





पंजाबला दुसरा धक्का, प्रभसिमरन बाद

पंजाब किंग्जची दुसरी विकेट पडली. प्रभसिमरन सिंग 7 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. मयंक यादवने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पदार्पणाच्या सामन्यात मयंकची ही दुसरी विकेट होती. पंजाबने 13.3 षटकात 128 धावा केल्या आहेत.





पंजाबला विजयासाठी 79 धावांची गरज

पंजाब किंग्जने 13 षटकांत 1 गडी गमावून 121 धावा केल्या. शिखर धवन 44 चेंडूत 66 धावा करून खेळत आहे. पंजाबला आता विजयासाठी 42 चेंडूत 79 धावांची गरज आहे.

पंजाबला पहिला धक्का, बेयरस्ट्रो बाद

लखनौला मयंक यादवने पहिली विकेट मिळवून दिली. पदार्पणाच्याच सामन्यात त्याने विकेट घेतली. पंजाब किंग्जचा जॉनी बेयरस्ट्रो बाद 42 धावा करून बाद झाला. 29 चेंडूंचा सामना करताना त्याने 3 चौकार आणि 3 षटकार मारले.

पंजाब किंग्सच्या 10 षटकांत 98 धावा

पंजाब किंग्सने चांगली सुरुवात केली आहे. एकही विकेट न गमावता पंजाब किंग्सने 10 षटकांत 98 धावा केल्या आहेत. शिखर धवनने अर्धशतक पूर्ण केले असून त्याला बेयरस्ट्रोची देखील चांगली साथ मिळते आहे. 





शिखन धवन अन् बेयरस्ट्रोची तुफान फटकेबाजी

पंजाब किंग्सचे सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि बेयरस्ट्रोने पहिल्या 6 षटकांत आक्रमक फलंदाजी केली. 6 षटकांत दोघांनी 61 धावा केल्या.

पंजाब किंग्सला विजयासाठी 200 धावांचं आव्हान

लखनौने पंजाब किंग्सला विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं आहे. कृणाल पांड्याने आक्रमक फलंदाजी करत 22 चेंडूत 43 धावा केल्या. यामध्ये त्याने 2 षटकार आणि 4 चौकार लगावले.





IPL 2024 : लखनौला आणखी एक धक्का

LSG Vs PBKS LIVE Score Updates :   रवि बिश्नोई शून्यावर बाद झाला. सॅम करन याला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बिश्नोई बाद झाला. लखनौ सात बाद 189 धावा

IPL 2024 : लखनौला सहावा धक्का

LSG Vs PBKS LIVE Score Updates :  आयुष बडोनीच्या रुपाने लखनौला सहावा धक्का बसला आहे. आयुष बडोनी 8 धावा काढून बाद झाला.  लखनौ 6 बाद 189 धावा

IPL 2024 : लखनौचा अर्धा संघ तंबूत

LSG Vs PBKS LIVE Score Updates :  कर्णधार निकोलस पूरन 42 धावा काढून बाद झाला. लखनौचा अर्धा संघ तंबूत परतला

IPL 2024 : लखनौला चौथा धक्का

LSG Vs PBKS LIVE Score Updates : अर्धशतकानंतर क्विंटन डी कॉक बाद झाला. अर्शदीप सिंह याने क्विंटन डी कॉकला 54 धावांवर बाद केले. लखनौ 4 बाद 125 धावा

लखनौला तिसरा धक्का; स्टॉयनिस बाद

लखनौची तिसरी विकेट पडली. राहुल चहरने मार्कस स्टॉयनिसला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. 12 चेंडूत 19 धावा करून तो बाद झाला. स्टॉइनिसने 2 षटकार मारले. लखनौने 8.4 षटकांत 3 गडी गमावून 78 धावा केल्या. 

लखनौला पहिला धक्का; केएल राहुल बाद

लखनौला पहिला धक्का बसल आहे. केएल राहुल 9 चेंडूत 15 धावा करत बाद झाला आहे. अर्शदीप सिंगने त्याला झेलबाद केले.

डी कॉकची आक्रमक फलंदाजी

लखनौसाठी डी कॉक शानदार फलंदाजी करत आहे. तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने चौकार मारला. यानंतर त्याने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकला. अशाप्रकारे लखनौने 3 षटकांनंतर बिनबाद 23 धावा केल्या. राहुल 3 धावा करून खेळत आहे. डी कॉक 14 चेंडूत 19 धावा करून खेळत आहे.

केएल राहुल दुखापतग्रस्त; लखनौला धक्का

लखनौचा नियमित कर्णधार केएल राहुल दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात केएल राहुल फक्त इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फक्त फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. केएल राहुल याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. पण अनुभवी कर्णधार मैदानात नसणं, लखनौसाठी मोठा धक्का मानला जातोय. 

लखनौ सुपर जायंट्स अन् पंजाब किंग्सची पाहा Playing XI

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (W), केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, निकोलस पूरन (C), मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, मयंक यादव, मणिमरन सिद्धार्थ


पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (C), जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरान, जितेश शर्मा (W), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग

लखनौने नाणेफेक जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय; आज निकोलस पूरन कर्णधारपद सांभाळणार

लखनौने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंजाब किंग्स गोलंदाजी करताना दिसेल. आजच्या सामन्यातील विशेष म्हणजे लखनौ संघाचे कर्णधारपद आज केएल राहुलकडे नसून निकोलस पूरन सांभाळणार आहे. 





आयपीएलमधील आजच्या लढतीसाठी लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स सज्ज

डेविड विलीनं आयपीएलमधून माघार घेतली, लखनौमध्ये मॅट हेन्रीची एंट्री

लखनौ सुपर जाएंटसला पंजाबच्या मॅचपूर्वी धक्का बसला आहे. डेविड विलीनं आयपीएलमधून माघार घेतली आहे. लखनौमध्ये आता मॅट हेन्रीची एंट्री झाली आहे. 





पंजाबला दुसरा विजय मिळणार का?

पंजाब किंग्ज यंदाच्या आयपीएलची सुरुवात विजयानं केली होती. दिल्ली कॅपिटल्सवर त्यांनी विजय मिळवला होता. तर, दुसरीकडे त्यांना आरसीबी विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. 

Punjab Kings : पंजाब किंग्ज संभाव्य प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्ज संभाव्य प्लेइंग इलेव्हन
शिखर धवन (कर्णधार) जॉनी बेयरस्टो,  सॅम करुन,लियम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर) शशांक सिंह, हरप्रीत बरार, हर्षल पटेल,कागिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह,


संभाव्य इम्पॅक्ट प्लेअर 
ऋषी धवन, प्रभासिमरन सिंह, मोहित राठी, अथर्व तायडे  

Punjab Kings : पंजाब किंग्ज संभाव्य प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्ज संभाव्य प्लेइंग इलेव्हन
शिखर धवन (कर्णधार) जॉनी बेयरस्टो,  सॅम करुन,लियम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर) शशांक सिंह, हरप्रीत बरार, हर्षल पटेल,कागिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह,


संभाव्य इम्पॅक्ट प्लेअर 
ऋषी धवन, प्रभासिमरन सिंह, मोहित राठी, अथर्व तायडे

Lucknow Weather : लखनौ आणि पंजाबच्या मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय येईल का?

लखनऊ सुपर जाएंटस आणि पंजाब किंग्ज यांच्यातील मॅचमध्ये पावसाचा कोणताही व्यत्यय येणार  नसल्याचं वातावरण आहे. निश्चित वेळेत मॅच सुरु होऊ शकते.

लखनौ की पंजाब नेमकं कोण जिंकणार? गुगल प्रेडिक्शनमध्ये नेमका कौल कुणाला?

लखनौ सुपर जाएंटस आणि पंजाब किंग्ज यांच्यात नेमका कुणाचा विजय होणार यासंदर्भात गुगल प्रेडिक्शनच्या अंदाजानुसार लखनौ आजची मॅच जिंकू शकते.  

LSG vs PBKS : पंजाब आणि लखनऊ कितीवेळा आमने सामने, यापूर्वी कोण ठरलेलं वरचढ

आयपीएलमध्ये लखनौ सुपर जाएंटस आणि पंजाब किंग्ज यांच्यात तीन मॅच झाल्या आहेत. यामध्ये लखनौनं दोन वेळा तर  पंजाबनं एकदा विजय मिळवला आहे.

लखनौ आणि पंजाब गुणतालिकेत कितव्या स्थानी

लखनौ सुपर जाएंटसला अद्याप स्पर्धेतील पहिला विजय मिळवता आलेला नाही. तर, पंजाबनं दिल्लीला पराभूत करत एका विजयाची नोंद केली आहे. पंजाबचा संघ पाचव्या स्थानी तर लखनौ नवव्या स्थानी आहे. 

पार्श्वभूमी

LSG Vs PBKS LIVE Score Updates, IPL 2024 : आज पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि लखनौला सुपर जाएंटस (Lucknow Super Giants)  यांच्यात झालेल्या सामन्यात लखनौने बाजी मारली. लखनौने 21 धावांनी पंजाब किंग्सवर विजय मिळवला.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.