Share Market : सेन्सेक्समध्ये 500 अंकांची उसळी, निफ्टी 25200 पार, शेअर बाजारातील तेजीची प्रमुख कारणं
Share Market : भारतीय शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्सनं 500 अंकांनी उसळी घेतली. निफ्टी 50 मध्ये 169.90 अकांची वाढ झाली.

शेअर बाजारात जोरदार तेजी
1/7
भारतीय शेअर बाजारात 16 सप्टेंबरला जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये 500 अंकांनी वाढ झाली तर निफ्टी 50 नं 25200 चा टप्पा पार केला. जागतिक बाजारातून मिळालेले सकारात्मक संकेत आणि भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराची शक्यता वाढल्यानं शेअर बाजार मजबूत झाला.
2/7
शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये 594.95 अंकांची वाढ होऊन तो 82380 वर पोहोचला. तर, निफ्टी 50 मध्ये 169.90 अंकांची वाढ होऊन तो 25239.10 अंकांवर पोहोचला. निफ्टीवर अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, महिंद्रा अँड महिंद्रा या सारख्या कंपन्यांच्या शेअरमध्ये 2 टक्क्यांपर्यंत तेजी आली.
3/7
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. अमेरिकेचे असिस्टंट ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह ब्रँडन लिंच ट्रेड डील या सारख्या मुद्यांवर मार्ग करण्यासाठी नवी दिल्लीत दाखल होत आहे. याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून आला.
4/7
अमेरिकेच्या फेडर रिझर्व्हकडून व्याज दरात कपातीची अपेक्षा असल्यानं खरेदी दिसून येत आहे. फेडरल रिझर्व्हची बैठक 16 सप्टेंबरला सुरु होऊन 17 सप्टेंबरला संपणार आहे. बाजार विश्लेषकांच्या मते फेडकडून किमान 25 बेसिस पॉईंटच्या कपातीची अपेक्षा आहे.
5/7
आशियाई बाजारात मंगळवारी तेजी पाहायला मिळाली. दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपनाचा निक्केई 225 आणि हाँगकाँगचा हँग सँग निर्देशांक तेजीसह बंद झाला. अमेरिकेचा शेअर बाजार देखील तेजीसह बंद झाला.
6/7
भारतीय रुपया आज मजबूत झाल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीच्या कारभारात अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत रुपया 12 पैशांनी मजबूत होऊन 88.04 वर आला. भारत आणि अमेरिका व्यापार कराराच्या अपेक्षा वाढल्यानं गुंतवणुकीची भावना वाढली.
7/7
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 16 Sep 2025 03:58 PM (IST)