गुजरातची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
IPL 2023, LSG vs GT : गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
IPL 2023, LSG vs GT : गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौमधील इकाना स्टेडिअमवर राहुल आणि हार्दिक पांड्या यांच्यात सामना होत आहे. खेळपट्टी संथ आहे.. ती आणखी खराब होण्याआधी फलंदाजी केलेली बरी, असे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या हार्दिक पांड्याने सांगितले. त्याशिवाय अल्जारी जोसेफ आजच्या सामन्यात नसेल, अशी माहितीही हार्दिक पांड्याने दिली.
लखनौचा कर्णधार हार्दिक पांड्याला या मैदानावर प्रथम फलंदाजी करायची होती. खेळपट्टी संथ दिसत आहे. जसा जसा सामान पुढे जाईल, खेळपट्टी आणखी संथ होऊ शकते, असे राहुल म्हणाला. गुजरात आणि लखनौ संघात एक एक बदल करण्यात आला आहे. पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग ११...
गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हन:
ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, अभिनव मनोहर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा
लखनौ सुपर जायंट्सची प्लेईंग इलेव्हन -
काइल मायर्स,केएल राहुल (कर्णधार), दीपक हुड्डा, कृणाल पांड्या, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, रवि बिश्नोई, आवेश खान, नवीन उल हक, अमित मिश्रा
GT vs LSG Head To Head : हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये लखनौ (LSG) आणि गुजरात (GT) या संघांमध्ये आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये गुजरात संघाचं पारड जड दिसून आलं आहे. गुजरात टायटन्स संघाने दोन्ही सामने जिंकले आहेत, पण लखनौला एकही सामना जिंकता आलेला नाही. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Ekana Stadium Lucknow Pitch Report : इकाना खेळपट्टी कशी आहे?
गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील हा सामना भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर (Ekana Stadium) होणार आहे. टी 20 साठी ही खेळपट्टी खूपच संतुलित आहे. खेळपट्टी फलंदाजीसोबतच गोलंदाजांसाठीही उपयुक्त आहे. येथे खेळल्या गेलेल्या एकूण सहा टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने पाच वेळा विजय मिळवला आहे. अशा वेळी नाणेफेक जिंकणं महत्त्वाचं ठरू शकतं. तसेच, पहिल्यांदा फलंदाजी करताना सरासरी 151 धावा होतात. या खेळपट्टीवर फिरकीपटू वर्चस्व गाजवू शकतात.