RR vs DC : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ मैदानात उतरणार आहेत. राजस्थानचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. त्यांनी 11 पैकी 7 सामने जिंकत 14 गुण मिळवले आहेत. त्यांचा रनरेटही चांगला असल्याने ते तिसऱ्या स्थानावर आहेत. तर दिल्लीचा संघ 11 पैकी 5 सामनेच जिंकल्याने 10 गुणांसह पाचव्या स्थानी आहे. राजस्थानचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे चान्सेस अधिक असले तरी दिल्लीचे आव्हानही कायम आहे. त्यात इतर संघाचे सामने आणि गुणतालिकेच्या गणितावर सर्व अवलंबून असणार आहे.


आजचा राजस्थान रॉयल्स (RR) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यातील सामना नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानावर होणार आहे. या मैदानावर मागील सामन्यात मुंबईच्या बुमराहने 5 विकेट्स घेत इतिहास रचला. तर त्यानंतर त्या सामन्यातच केकेआरने मुंबईला अवघ्या 113 धावात ऑलआऊट केलं. त्यामुळे याठिकाणी वेगवान गोलंदाजांना मदत मिळत असल्याने सामना चुरशीचा होऊ शकतो. सामना सायंकाळी असल्यान दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता आहे, पण मागील सामन्याचं पाहता आज नाणेफेक जिंकणारा नेमका कोणता निर्णय घेईल हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल.


कधी आहे सामना?


आज 11 मे रोजी होणारा राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानावर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स हा आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


हे देखील वाचा-