LSG vs DC IPL 2024: लखनौला पराभवाचा धक्का, केएल. राहुलचं लॉजिक फेल ठरलं, रिषभपचा एक निर्णय गेमचेंजर

LSG vs DC IPL 2024: आज आयपीएल 2024 च्या हंगामात लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा (DC) सामना होणार आहे.

मुकेश चव्हाण Last Updated: 12 Apr 2024 11:15 PM
दिल्लीनं लखनौचा विजयरथ रोखला, रिषभ पंतच्या सेनेचा दुसरा विजय

दिल्ली कॅपिटल्सनं लखनौ सुपर जाएंटसं दिलेलं  167 धावांचं आव्हान यशस्वीपणे पार केलं आहे. दिल्लीनं आज स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला आहे.

दिल्लीला लागोपाठ दोन धक्के, फ्रेजर मैक्गर्क आणि रिषभ पंत बाद

दिल्लीला लागोपाठ दोन धक्के बसले आहेत. दिल्लीला विजय मिळवून देतील असं वाटत असताना फ्रेजर मैक्गर्क आणि रिषभ पंत लागोपाठ बाद झाले. रिषभ पंतनं 41 तर फ्रेजर मैक्गर्कनं 55 धावा केल्या. 

दिल्लीच्या 100 धावा पूर्ण, पंत -फ्रेजर मैक्गर्कनं डाव सावरला

दिल्लीच्या 100 धावा पूर्ण झाल्या असून पंत -फ्रेजर मैक्गर्कनं 50 धावांची भागिदारी करत दिल्लीचा डाव सावरला आहे.

दिल्लीला दुसरा धक्का, पृथ्वी शॉ बाद

दिल्ली कॅपिटल्सला दुसरा धक्का बसला आहे. पृथ्वी शॉला 32 धावांवर  रवि बिष्णोईनं बाद केलं. 

दिल्लीला पहिला धक्का, डेव्हिड वॉर्नर बाद

दिल्ली पहिला धक्का बसला असून डेव्हिड वॉर्नर 8 धावा करुन बाद झाला.

आयुष बदोनी अरशद खाननं डाव सावरला, लखनौच्या 7 विकेटवर 167 धावा

आयुष बदोनी अरशद खाननं डाव सावरल्यानं लखनौच्या 7 विकेटवर 167 धावा झाल्या आहेत.

लखनौला सातवा धक्का,कृणाल पांड्या 3 धावांवर बाद

लखनौला सातवा धक्का बसला असून कृणाल पांड्या 3 धावांवर बाद झाला आहे. कृणाल पांड्याला मुकेश कुमारनं बाद केलं. 

लखनौला सहावा धक्का, रणदीप हुड्डा 10 धावांवर बाद

लखनौ सुपर जाएंटसला सहावा धक्का बसला आहे. रणदीप हुड्डा 10 धावांवर बाद झाला आहे. इशांत शर्मानं त्याला बाद केलं.  

लखनौला पाचवा धक्का, केएल राहुल बाद, रिषभ पंतचा डीआरएसचा निर्णय सक्सेसफुल

लखनौला पाचवा धक्का बसला असून केएल राहुल बाद 39 धावा करुन बाद झाला आहे. रिषभ पंतचा डीआरएसचा घेण्याचा निर्णय सक्सेसफुल ठरला आहे. कुलदीप यादवनं लखनौचा आज तिसरा फलंदाज बाद केला.  

निकोलस पूरन आला तसा गेला, कुलदीप यादवनं टाकलेला बॉल कळलाच नाही

लखनौला चौथा धक्का बसला असून कुलदीप यादवनं निकोलस पूरनला शुन्यावर बाद केलं. 

लखनौ सुपर जाएंटसला तिसरा धक्का, स्टॉयनिस 8 धावांवर बाद

कुलदीप यादवनं लखनौला तिसरा धक्का दिला आहे. त्यानं स्टॉयनिसला 8 धावांवर बाद केलं. 

पॉवरप्लेमध्ये लखनौच्या 2 विकेट, सहा ओव्हरमध्ये 57 धावा

लखनौ सुपर जाएंटसनं आक्रमक सुरुवात केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सनं दोन धक्के दिले आहेत. दिल्लीचा बॉलर खलील अहमदनं दोन विकेट घेतल्या. केएल राहुलनं एका बाजूनं लखनौचा डाव सावरला. लखनौनं सहा ओव्हरमध्ये  2 बाद 57 धावा केल्या आहेत. 

दिल्ली कॅपिटल्सची टीम

डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शे होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल,जॅक फ्रेजर, कुलदीप यादव, मुकेश कुमार, ईशांत शर्मा  खलील अहमद  

लखनौची टीम

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, देवदत्त पडिक्कल, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, यश ठाकूर, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, अरशद खान

लखनौनं टॉस जिंकला, के.एल. राहुलचा बॅटिंगचा निर्णय

लखनौनं टॉस जिंकला असून के.एल. राहुलनं बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.  

दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांना सूर गवसणार?

दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत तळाला आहे. दिल्ली कॅपिटल्सनं आतापर्यंत एक मॅच जिंकली आहे. त्यांनी चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केलं.मात्र, त्यानंतर त्यांना विजय मिळवता आलेला नाही.याचं प्रमुख कारण फलंदाजांची खराब कामगिरी ठरली आहे. 

मयंक यादव अजून आठवडाभर संघाबाहेर राहणार

लखनौ सुपर जाएंटसचा वेगवान गोलंदाज मयंक यादव दुखापतीमुळं संघाबाहेर असेल. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये तो संघात परतू शकतो. 

आरसीबीच्या अडचणी वाढल्या, मुंबईला मोठा फायदा; पाहा आयपीएलचे Latest Points Table

पाहा 11 जणांची परफेक्ट टीम

दिल्ली कॅपिटल्सचे संभाव्य Playing XI

डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, ललित यादव, अक्षर पटेल, झ्ये रिचर्डसन, इशांत शर्मा, खलील अहमद, रसिक दार/सुमित कुमार.

लखनौ सुपर जायंट्सची संभाव्य Playing XI

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, देवदत्त पडिक्कल, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, यश ठाकूर, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, एम सिद्धार्थ.

दिल्ली कॅपिटल्सचं ट्विट



खेळपट्टी कशी असेल?

एकना स्टेडियमवर या हंगामात आतापर्यंत दोन आयपीएल सामने खेळले गेले आहेत. आत्तापर्यंत येथील मैदान टी-20 क्रिकेटच्या दृष्टिकोनातून खूप संतुलित दिसत होते. लखनौने घरच्या मैदानावर खेळलेले दोन्ही सामने जिंकले आहेत. दोन्ही सामन्यात घरच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. लखनौ आणि गुजरात यांच्यातील शेवटचा सामना लाल मातीच्या खेळपट्टीवर खेळला गेला, ज्यावर गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा डाव अवघ्या 130 धावांत आटोपला. अशा स्थितीत आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय दोन्ही कर्णधारांना आवडेल.

दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा सामना

आयपीएल 2024 मधील 26 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. लखनौच्या एकना स्टेडियमवर होणारा हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असेल. एकीकडे, लखनौला चौथा विजय मिळवून अव्वल-4 मध्ये आपले स्थान कायम राखायचे आहे, तर दुसरीकडे, दिल्लीला हंगामातील दुसरा विजय मिळवून स्पर्धेत कायम ठेवण्याचे आव्हान असेल.

पार्श्वभूमी

Lucknow Super Giants vs Delhi Capitals IPL 2024:  आज आयपीएल 2024 च्या हंगामात लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा (DC) सामना होणार आहे. हा सामना एकाना मैदानात रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजचा हा सामना सुरु होईल. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.