CSK vs LSG, IPL Live : चेन्नई विरुद्ध लखनौ लढत; सामन्यासंदर्भातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

CSK vs LSG, IPL Live : चेन्नई विरुद्ध लखनौ लढत? सामन्यासंदर्भातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क Last Updated: 03 May 2023 05:24 PM
सामन्यात पावसाचा व्यक्तय

लखनौ आणि चेन्नई यांच्यातील सामन्यात पावसाचा व्यत्यय आलाय. कव्हर्स मैदानावर लावण्यात आले आहेत.

लखनौला सहावा धक्का

लखनौला सहावा धक्का बसला आहे. निकोलस पूरन बाद झालाय

निकोलस पूरन आणि आयुष बडोनी यांनी डाव सावरला

निकोलस पूरन आणि आयुष बडोनी यांनी लखनौचा डाव सावरला

लखनौचा अर्धा संघ तंबूत

लखनौचा अर्धा संघ तंबूत परतलाय. करण शर्मा 9 धावांवर बाद झालाय

लखनौची फलंदाजी ढेपाळली

चेन्नईच्या भेदक माऱ्यासमोर लखनौची फलंदाजी ढेपाळली आहे. लखनौने 9 षटकात फक्त 42 धावा केल्या आहेत. यादरम्यान लखनौने चार विकेट गमावल्या आहेत. मनन वोहरा 10, काइल मेयर्स 14, कृणाल पांड्या 0 आणि मार्कस स्टॉयनिस सहा धावांवर स्वस्तात बाद झाले आहेत. सध्या मैदानावर करण शर्मा आणि निकोलस पूरन आहेत. आरसीबी आणि लखनौप्रमाणेच हा समाना लो स्कोरिंग होण्याची शक्यता आहे.

लखनौला दुसरा धक्का

मनन वोहराच्या रुपाने लखनौला दुसरा धक्का बसला आहे. वोहरा 10 धावा काढून बाद झालाय.

लखनौला पहिला धक्का

लखनौला पहिला धक्का बसला आहे. काइल मेयर्स अवघ्या 14 धावांवर तंबूत परतलाय

चेन्नईचे 11 शिलेदार कोणते ?

ऋतुराज गायकवाड, डेवेन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोइन अली, शिवम दूबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर आणि कर्णधार), दीपक चाहर, मथीशा पथिराना, तुषार देशपांडे, महेश तिक्षणा

लखनौ सुपर जायंट्स संघाची प्लेईंग 11 -

काइल मेयर्स, मनन वोहरा, करण शर्मा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृणाल पांड्या (कर्णधार), कृष्णप्पा गौतम, नवीन-उल-हक, रवि बिश्नोई आणि मोहसिन खान. 

चेन्नईने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

चेन्नईने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

CSK vs LSG, IPL Live : लखनौमध्ये पावसाने उसंत घेतली, नाणेफेक उशीराने

CSK vs LSG, IPL Live : लखनौमध्ये पावसाने उसंत घेतली, नाणेफेक उशीराने

CSK vs LSG, IPL Live : लखनौमध्ये पाऊस सुरु झाल्याने नाणेफेक उशीराने

CSK vs LSG, IPL Live : लखनौमध्ये पाऊस सुरु झाल्याने नाणेफेक उशीराने

KL Rahul Ruled Out : लखनौ सुपर जायंट्स संघाला मोठा झटका, कर्णधार केएल राहुल आयपीएलमधून बाहेर?

KL Rahul Ruled Out of IPL : लखनौ सुपर जायंट्स संघाला मोठा झटका बसला आहे. कर्णधार केएल राहुल आयपीएल 2023 मधून बाहेर पडणार हे निश्चित झालं आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

CSK vs LSG Head to Head : हेड टू हेड आकडेवारी पाहा 

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Gaints) या दोन संघात आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. या दोन्ही संघांची स्थिती समान आहे. चेन्नई आणि लखनौ दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे.

CSK vs LSG : केएल राहुलच्या दुखापतीबाबत सस्पेंस कायम, धोनी विरुद्ध मैदानात कोण उतरणार?

आजच्या सामन्यात केएल राहुलच्या खेळण्याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. रॉयल चॅलेंजर्स विरुद्धच्या मागील सामन्यादरम्यान केएल राहुलला दुखापत झाली होती. केएल राहुलच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. त्यामुळे केएल राहुल खेळणार की त्याच्याऐवजी दुसऱ्या खेळाडूची एंट्री होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

IPL 2023 CSK vs LSG Live : आज लखनौच्या मैदानावर चेन्नईची कसोटी

IPL 2023 CSK vs LSG Live : आयपीएल 2023 चा 45 व्या सामन्यात आज लखनौच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. यंदाच्या मोसमातील 20 व्या सामन्यात या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळाली होती. चेन्नईच्या घरच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर लखनौला चेन्नईकडून पराभव स्वीकारावा लागला होता. चेन्नईने हा सामना 12 धावांनी जिंकला होता. या चेन्नईचा यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी आता लखनौ संघ सज्ज झाला आहे. शेवटच्या सामन्यात पंजाबने चेन्नईचा तर बंगळुरुने लखनौचा पराभव केला आहे.

IPL 2023 CSK vs LSG Live : चेन्नई आणि लखनौ आमने-सामने

IPL 2023 CSK vs LSG Live : आयपीएल 2023 च्या 45 व्या सामन्यात चेन्नई (Chennai Super Kings) लखनौ (Lucknow Super Giants) दोन संघ आमने-सामने येणार आहेत.



 

पार्श्वभूमी

IPL 2023 CSK vs LSG : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) आज डबल हेडर सामने खेळवले जाणार आहे. यातील पहिला सामन्यात चेन्नई (CSK) आणि लखनौ (LSG) यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. मागील सामन्यात धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई (Chennai Super Kings) संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर केएल राहुलच्या (KL Rahul) लखनौ (Lucknow Super Giants) संघानेही आरसीबीविरुद्धचा शेवटचा सामना गमावला आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात केएल राहुलच्या खेळण्याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. रॉयल चॅलेंजर्स विरुद्धच्या मागील सामन्यादरम्यान केएल राहुलला दुखापत झाली होती. केएल राहुलच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. त्यामुळे केएल राहुल खेळणार की त्याच्याऐवजी दुसऱ्या खेळाडूची एंट्री होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


केएल राहुलच्या दुखापतीबाबत सस्पेंस कायम


मागील सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे केएल राहुलला झालेल्या दुखापतीमुळे तो चेन्नईविरोधातील आजच्या सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण, अद्याप संघाकडून केएल राहुलच्या दुखापतीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. केएल राहुल आजच्या सामन्याला अनुपस्थितीत राहिल्यास कृणाल पांड्याकडे संघाची धुरा असू शकते. त्यामुळे लखनौच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. लखनौ संघ दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी खेळाडू क्विंटन डी कॉकला संधी देऊ शकते. डी कॉकने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. गेल्या मोसमात त्याने 508 धावा केल्या होत्या. 


चेन्नई संघात कोणता बदल?


चेन्नई संघाने गेल्या काही सामन्यांपासून प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही. त्यामुळे या सामन्यातही चेन्नई संघात काही बदल करणार नाही, अशी शक्यता आहे. बेन स्टोक्स दुखापतीमुळे बाहेर आहे. त्याच्या फिटनेसबाबत अद्याप कोणतेही अपडेट समोर आलेली नाही. दरम्यान, चेन्नईचे फलंदाज आणि गोलंदाज दिवसेंदिवस चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. चेन्नई आणि लखनौ दोन्ही संघ गुणतालिकेतही टॉप 4 मध्ये आहे.


Ekana Stadium Lucknow Pitch Report : इकाना खेळपट्टी कशी आहे?


भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियम (Ekana Stadium) ची खेळपट्टी टी20 च्या दृष्टीने येथील खूपच संतुलित आहे. खेळपट्टी फलंदाजीसोबतच गोलंदाजांसाठीही उपयुक्त आहे. येथे खेळल्या गेलेल्या एकूण सहा टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने पाच वेळा विजय मिळवला आहे. अशा वेळी नाणेफेक जिंकणं महत्त्वाचं ठरू शकतं. तसेच, पहिल्यांदा फलंदाजी करताना सरासरी 151 धावा होतात. या खेळपट्टीवर फिरकीपटू वर्चस्व गाजवू शकतात.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.