Ajinkya Rahane Ruled out IPL 2022: आयपीएलचा पंधरावा अंतिम टप्प्यावर पोहचलेला असताना कोलकाता नाइट रायडर्सला आणखी एक धक्का बसला आहे. पॅट कमिन्सनंतर सलामीवीर अजिंक्य रहाणेही स्पर्धेतून बाहेर झाला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रहाणेला दुखापत झाली होती. ज्यामुळं क्षेत्ररक्षण करताना त्याला मैदानात येता आलं नव्हतं. अजिंक्य रहाणेला ग्रेड थ्रीच्या हॅमस्ट्रिंगला गंभीर दुखापत झाली. तो सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सच्या बायो बबलमधून बाहेर पडला आहे, अशी माहिती समोर आली.


ट्वीट-



अजिंक्य राहाणेला दुखापतीतून सावरण्यासाठी चार आठवड्यांचा कालावधी लागणार
मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेला दुखापत झाली आहे.  राजस्थानविरुद्ध सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्याला ग्रेड- थ्री हॅमस्ट्रिंग आहे. ज्यामुळं त्याला इंग्लंड दौऱ्यातून मुकावं लागू शकतं. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला किमान चार आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. 


अजिंक्य रहाणेची आयपीएल 2022 मधील कामगिरी
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अजिंक्य रहाणेला काही खास कामगिरी करता आली नाही. या हंगामात त्यानं सात सामन्यात 19 च्या सरासरीनं 133 धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्याला एकही अर्धशतक करता आलं नाही. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये कोलकात्याच्या संघानं अजिंक्य राहणेला त्याची मूळ किंमत 1 कोटीत विकत घेतलं होतं.


भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधारानं आधीच प्लेइंग इलेव्हनमधील स्थान गमावलं आहे. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराच्या जागी हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यरला संघात स्थान देण्यात आलं. पुजारानं नुकतेच काऊन्टी क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. परंतु, रहाणेचं भारतीय संघात पुनरागमन करण्याचा मार्ग अवघड दिसत आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यासाठीचा या आठवड्यात भारतीय संघ जाहीर केला जाऊ शकतो.


हे देखील वाचा-