KKR vs SRH: पहिल्यांदाच आयपीएलच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या गुजरात टायटन्सनं दमदार कामगिरी करून दाखवली आहे. एवढेच नव्हेतर, यंदाच्या हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा पहिला संघ ठरला आहे. प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज बाहेर झालाय. आता सात संघामध्ये उर्वरित तीन जांगासाठी रस्सीखेच सुरू आहे. या शर्यतीत हैदराबादचा संघही आहे. हैदराबादला प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्यसाठी पुढील तीन सामने जिंकावे लागतील. जरी हैदराबादनं एखादा सामना गमावला तरीही त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी असेल. परंतु, त्यांना इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार.
आज कोलकात्याशी भिडणार हैदराबादचा संघ
आज रात्री सनरायझर्स हैदराबादचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. हैदराबादनं हा सामना जिंकल्यास त्यांच्या प्लेऑफच्या आशा कायम राहतील. हैदराबाद संघानं आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत हैदराबादचा संघ सातव्या स्थानावर आहे. कोलकात्याविरुद्ध विजय मिळवल्यास हैदराबादचे 12 गुण होतील. त्यानंतर उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवल्यानंतर हैदाराबादचे 16 गुण होतील.
एक पराभव हैदराबादला पडेल महागात
कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात आज पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियवर सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात हैदराबादचा पराभव झाल्यास त्यांच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचा मार्ग खडतर होईल. सध्या राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचे प्रत्येकी 14-14 गुण आहेत. राजस्थान आणखी दोन तर, रॉयल चॅलेंजर्सला एक सामना खेळायचा आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांचे प्रत्येकी 12-12 गुण आहेत. दोन्ही संघाला त्यांचे उर्वरित दोन सामने खेळायचे आहेत.
हे देखील वाचा-