CSK vs MI, IPL 2022: मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर चेन्नई सुपरकिंजच्या (Chennai Super Kings vs Mumbai Indians) संघाचं यंदाच्या हंगामातील आव्हान संपुष्टात आलं. या सामन्यात चेन्नईच्या संघ 97 धावांवर ढेपाळला. या सामन्यात मुंबईचा युवा गोलंदाज कुमार कार्तिकेयनं (Kumar Kartikeya) दमदार प्रदर्शन केलं. त्यानं तीन षटकात 22 धावा देऊन दोन विकेट्स मिळवल्या. या सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) कुमार कार्तिकेयच्या कामगिरीवर प्रभावित होऊन त्याला खास बॉल गिफ्ट केला, ज्यावर धोनीची स्वाक्षरी होती. 


मुंबईनं नुकताच ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये कार्तिकेय धोनीचा सही केलेला चेंडू दाखवत आहे. सुमारे 1500 लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. तर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्विटरवर यूजर्सनी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कार्तिकेयनं धोनीनं स्वाक्षरी केलेला चेंडू मिळाल्यानं आनंद व्यक्त केला. या सामन्यात त्यानं चांगली कामगिरी करत ड्वेन ब्राव्हो आणि सिमरजीत सिंह यांच्या विकेट घेतल्या.


चेन्नई- मुंबईची आयपीएल 2022 मधील कामगिरी
आयपीएलचा पंधरावा हंगाम आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपला आहे. आयपीएलमध्ये सर्वात मजबूत संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या स्पर्धेतून बाहेर झाले आहेत.चेन्नई सुपर किंग्ज सध्या गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. चेन्नईनं आतापर्यंत 12 सामने खेळले असून 4 सामने जिंकले आहेत. तर 8 सामन्यांत पराभव स्वीकारला आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स गुणतालिकेत तळाशी म्हणजे दहाव्या स्थानावर आहे. मुंबईला 12 पैकी फक्त 3 सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर, 9 सामन्यांत पराभवाला सामोरे जावं लागलं होतं.


हे देखील वाचा-