IPL 2022: कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात  (Kolkata Knight Riders Vs Rajasthan Royals) आयपीएल 2022 चा 47 वा सामना  खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानच्या संघानं 20 षटकात पाच विकेट्स 152 धावा केल्या. राजस्थानकडून डेथ ओव्हरमध्ये फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या शिमरॉन हेटमायरनं (Shimron Hetmyer) आक्रमक खेळी करत नवा पराक्रम रचलाय. त्यानं 13 चेंडूत नाबाद 27 धावांची छोटी आणि झंझावाती खेळी केली. या कामगिरीसह त्यानं महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि दिनेश कार्तिकसह (Dinesh Kartik) अनेक खेळाडूंना मागं टाकलं आहे.


हेटमायर हा आयपीएल 2022 च्या डेथ ओव्हर्समध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. कोलकात्याविरुद्ध सामन्यात त्यानं डेथ ओव्हरमध्ये आक्रमक खेळी करत महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक आणि राहुल तेवतियाला मागं टाकलं आहे. डेथ ओव्हरमध्ये त्यानं 185 धावा केल्या आहेत. या यादीत दिनेश कार्तिक दुसऱ्या क्रमांकावर आहे. कार्तिकनं 150 धावा केल्या आहेत. तर, राहुल तेवतिया तिसऱ्या स्थानावर आहे. तेवतियानं डेथ ओव्हर्समध्ये 129 धावा केल्या आहेत.याशिवाय, डेथ ओव्हर्समध्ये 122 धावा करणारा धोनी चौथ्या क्रमांकावर आहे.


दरम्यान, मुंबईच्या वानखेडे मैदानावर  सुरू आयपीएलच्या 47 व्या सामन्यात  राजस्थानच्या संघानं कोलकाता नाईट रायडर्ससमोर 153 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकात्याच्या संघानं राजस्थानला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. दरम्यान, राजस्थानच्या संघानं 20 षटकात पाच विकेट्स गमावून 151 धावा केल्या आहेत. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसननं एकहाती झुंज दिली आहे. 


हे देखील वाचा-