Gautam Gambhir: आयपीएल 2022 च्या 45 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स एकमेकांसमोर आले. हा सामना लखनौच्या संघानं 6 धावांनी जिंकला. या विजयानंतर लखनौच्या संघानं प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचं अंतर कमी केलं आहे. लखनौच्या संघानं आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी सात सामन्यात विजय मिळवला आहे. तर, तीन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत लखनौचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, दिल्लीविरुद्ध लाईव्ह सामन्यात गौतम गंभीरनं शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. ज्यामुळं नेटकरी त्याच्यावर टीका करताना दिसत आहेत.
लखनौविरुद्ध सामन्यातील अखेरच्या षटकात दिल्लीच्या संघाला विजयासाठी 22 धावांची गरज होती. दरम्यान, दिल्लीला विजय मिळवून देण्यासाठी कुलदीप यादव आणि अक्षर पटेलनं प्रयत्न केला. परंतु, ते दोघेही अपयशी ठरले. दिल्लीचा संघ अखेरच्या षटकात केवळ 16 धावा करू शकला. लखनौच्या संघानं विजय मिळवल्यानंतर गौतम गंभीर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाला. त्यावेळी त्यानं केलेली शिवीगाळ कॅमेऱ्यात कैद झाली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
पाहा व्हिडिओ-
लखनौनं 6 धावांनी सामना जिंकला
या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथम फलंदाजी करत दिल्लीसमोर 196 धावांचं लक्ष्य ठेवलं. लखनौकडून कर्णधार केएल राहुलनं वादळी खेळी केली. त्यानं 51 चेंडूत 77 धावा केल्या. लखनौच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या संघाला 20 षटकात सात विकेट्स गामावून 189 धावापर्यंत मजल मारता आली. या सामन्यात लखनौचा गोलंदाज मोहसिन खानला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.
हे देखील वाचा-
- IPL 2022: आयपीएलमध्ये सर्वात मोठ्या भागीदाराचा विक्रम कोणत्या जोडीच्या नावावर? ऋतुराज- कॉन्वेचा यादीत समावेश
- IPL 2022 : उम्रान मलिकच्या वेगवान चेंडूचा सामना कसा कराल?, दिग्गज फलंदाज सुनील गावस्करांनी सांगितली 'टीप'
- IPL 2022 : हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुकेश चौधरीने फेकला वाईड बॉल, मैदानावर अवतरला कर्णधार धोनीचा रौद्रअवतार